बऱ्याच जणांना बाईक तसेच स्कूटर किंवा कार खरेदी करण्याची इच्छा असते. परंतु आर्थिक बजेट कमी असल्यामुळे प्रत्येकालाच शोरूम कार किंवा बाईक घेणे शक्य होत नाही. त्यामुळे बरेच जण हे सेकंड हॅन्ड कार किंवा स्कूटर तसेच बाईक खरेदी करण्याचा विचार करतात या माध्यमातून चांगल्या कंडिशनमध्ये असलेले वाहन आपल्याला मिळेल या दृष्टीने प्रयत्नशील असतात.
अशा सेकंड हॅन्ड वाहने आपल्याला जुने वाहन विक्री बाजारातून मिळू शकतात. परंतु त्याऐवजी काही बँकांच्या माध्यमातून देखील अशा प्रकारची संधी आपल्याला दिली जाते.
जेव्हा बँक एखादे वाहन कर्ज थकल्यामुळे ओढून आणतात अशा वाहनांची लिलावाच्या माध्यमातून बँक विक्री करत असतात व या माध्यमातून आपल्याला स्वस्तात कार किंवा स्कूटर तसेच बाईक खरेदी करता येऊ शकतो.
इंडसइंड बँक देत आहे लिलावद्वारे वाहन खरेदी
करण्याची सुवर्णसंधीबँकांच्या माध्यमातून ओढून आणलेले वाहने मूळ किमतीच्या 30 टक्के दराने विकले जात असून उदाहरणच घ्यायचे झाले तर या माध्यमातून दहा लाख रुपयापर्यंतची कार ही अवघ्या तीन लाख रुपये पर्यंत आपल्याला मिळते. या माध्यमातून कारची किंमत एक लाख रुपयांपासून ते सात लाखापर्यंत आहे.स्कुटीच्या किमती चक्क वीस हजार रुपयांपासून पुढे सुरू होतात.
जेव्हा कर्ज घेऊन वाहन खरेदी केले जाते तेव्हा त्या वाहनाचा हप्ता आपल्याला वेळेवर भरावा लागतो. परंतु जर अशा पद्धतीने ईएमआय किंवा हप्ता भरला गेला नाही तर मात्र संबंधित बँक वाहने जप्त करतात. अशा पद्धतीने वाहने जप्त केली तरी देखील मात्र बँकेचा पैसा हा अडकून पडतो.
त्यामुळे यावर उपाय म्हणून बँकांच्या माध्यमातून आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी त्या वाहनांचा लिलाव केला जातो. अशा पद्धतीच्या लिलावाची घोषणा ही स्थानिक वृत्तपत्रांच्या माध्यमातून केली जाते व आता डिजिटल पद्धतीने देखील अशा पद्धतीची घोषणा केली जाते.
याबाबत झालेली माहिती बघितली तर तुम्हाला दुचाकी किंवा चार चाकी वाहन स्वस्तामध्ये घ्यायचे असेल तर बँकेच्या माध्यमातून तुम्हाला लिलाव प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी देण्यात येत आहे. अशा पद्धतीने बँकेने ओढून आणलेल्या वाहनांचा लिलाव इंडस इझी व्हील या प्लॅटफॉर्मवर केला जाणार आहे.
या माध्यमातून इंडसइंड बँक ओढून आणलेल्या वाहनांचा लिलाव करणार असून ज्या वाहनांवर कर्ज घेतले आहे व त्या कर्जाचे हप्ते भरता आले नाहीत अशा वाहनांचा लिलाव या माध्यमातून होणार आहे. त्यामध्ये बँकेच्या माध्यमातून बऱ्याच वाहनांचा लिलाव केला जात असून या माध्यमातून चार चाकी आणि दुचाकी वाहने खरेदी करण्याची संधी मिळू शकते.
कार मिळेल स्वस्तात
जर आपण वाहनाच्या किमतीचा विचार केला तर ते या माध्यमातून मूळ किमतीच्या 30 टक्के दराने विकले जात असून जर किंमत दहा लाख रुपये असेल ते तुम्हाला फक्त तीन लाख रुपयांमध्ये मिळू शकणार आहेत.
अशा वाहनांबद्दल बँक तुम्हाला ही खात्री देईल
तुम्ही असे एखादे वाहन बँकेच्या लिलावाच्या माध्यमातून घेतले तर तुम्हाला बँकेच्या माध्यमातून त्या वाहनाचे संपूर्ण कागदपत्रे आणि एनओसी प्रमाणपत्र, कारवार कर्ज तसेच कारवर विमा काही प्रमुख सेवा तसेच वाहनात बिघाड झाल्यास वाहनासाठी रोडसाइड असिस्टंट आणि गो मेकॅनिक सेवा दिल्या जातील.
बँकेकडून वाहन घेताना ही काळजी घ्या
1- वाहना बद्दल माहिती मिळवा– बँकेने जप्त केलेली वाहने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किमतीचा आढावा घेण्यासाठी वाहनाचे मॉडेल आणि वर्ष तपासून घ्यावे व संबंधित वाहनाचा काही अपघात झाला आहे की नाही हे देखील बघावे व मेंटेनन्स नोंदी तपासून घ्याव्यात.
2- वाहनाची तपासणी करणे– बँकेच्या माध्यमातून वाहन खरेदी करण्यापूर्वी त्या वाहनाची कोणतीही तूट फूट किंवा समस्या आहे की नाही याची तपासणी करून घ्यावी तसेच काही गंज किंवा डेंट इतर काही नुकसान आहे की नाही हे देखील तपासून जाईल. तसेच टेस्ट ड्राईव्ह घेऊन पहावी.
3- कागदपत्रांची तपासणी करावी– असे वाहन खरेदी करण्याअगोदर त्या वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र, विमा आणि प्रदूषण प्रमाणपत्र इत्यादी सह वाहनांचे सर्व कागदपत्रे बरोबर असल्याची खात्री करून घ्यावी. वाहनाचे केलेले रजिस्ट्रेशन वैध आहे आणि सर्व कर भरले आहेत की नाही याची देखील पडताळणी करून घ्यावी. तसेच संबंधित वाहनाची कागदपत्रे मिळवण्यासाठी तुम्ही सरकारच्या mParivahan एप्लीकेशन चा वापर करू शकता.