ऑटोमोबाईल

महिंद्राची आत्ताच लॉन्च झालेली नवीकोरी महिंद्रा XUV 3XO करू शकतात 1.5 लाख रुपयांच्या डाऊन पेमेंटवर खरेदी! वाचा किती भरावा लागेल महिन्याला हप्ता?

Published by
Ajay Patil

आपण बऱ्याचदा वाहन खरेदी करण्याची प्लॅनिंग करतो. परंतु वाहनाची पूर्ण किंमत आपल्याला रोखीत भरता येईल इतका पैसा आपल्याकडे नसतो. त्यामुळे साहजिकच आपण वाहन कर्जाचा पर्याय निवडतो व याकरिता बँकेकडून किंवा एखाद्या फायनान्स कंपनीकडून वाहन खरेदीसाठी लोन घेत असतो.

साहजिकच आपण लोन घेतल्यानंतर आपल्याला महिन्याला त्याचा ईएमआय भरणे गरजेचे असते. अगदी याच पद्धतीने तुम्हाला महिंद्रा कंपनीची नुकतीच लॉन्च झालेली महिंद्रा  XUV 3XO खरेदी करायचे असेल व तुमच्याकडे पूर्ण रक्कम भरायला पैसे नसतील तर तुम्ही ती फायनान्सच्या माध्यमातून खरेदी करू शकतात. जर लोन घेऊन या एसयूव्हीचे बेस मॉडेल तुम्ही खरेदी केले तर तुम्हाला किती ईएमआय भरावा लागेल हे माहिती करून घेणे गरजेचे आहे.

कसा आहे महिंद्रा XUV 3XO कारचा फायनान्स प्लॅन?

जर तुम्ही महिंद्रा XUV 3XO मॉडेल रोख खरेदी केले तर तुमच्याकडे साधारणपणे आठ लाख 42 हजार रुपये असणे गरजेचे आहे. परंतु तुमच्याकडे इतका पैसा नसेल तर तुम्ही काही डाऊन पेमेंट करून लोन घेऊन ही कार खरेदी करू शकतात व तुम्हाला जर त्या पद्धतीने ही कार खरेदी करायची असेल तर आपण या कारसाठी असलेला ऑनलाइन फायनान्स प्लॅन बघणे गरजेचे आहे.

समजा तुम्ही या एसयुव्हीकरिता दीड लाख रुपये डाऊन पेमेंट केले तर उरलेल्या सहा लाख 91 हजार 750 रुपयांसाठी लोन घ्यावे लागेल. जर तुम्ही हे लोन घेऊन परतफेड साठी पाच वर्षाचा कालावधी ठेवला आणि बँकेने यावर वार्षिक व्याजदर 9.50% आकारला तर तुमचा मासिक ईएमआय 14360 रुपये भरणे गरजेचे राहील. तुम्हाला सर्व हप्त्यांसह बँकेला एकूण आठ लाख 61 हजार 600 रुपये भरणे गरजेचे राहिल.

कसे आहे महिंद्रा XUV 3XO एसयूव्हीचे डिझाईन?

महिंद्राच्या या कारचे डिझाईन पाहिले तर यामध्ये इंटिग्रेटेड डेटा टाईम रनिंग लाइट्स, मोठ्या सेंट्रल इयर इंटेक्स सोबत अपडेटेड अशी बंपर आणि नवीन डिझाईन केलेले ग्रीलसह सर्व एलईडी हेडलाईट देण्यात आलेले आहेत व मागच्या बाजूला बंपर इंटिग्रेटेड रजिस्ट्रेशन प्लेट,

फुल वाईड एलईडी लाईट बार आणि स्लीपर सी आकाराचे टेल लॅम्पसह अपडेटेड टेलगेट डिझाईन देण्यात आलेले आहे. या कारमध्ये देण्यात आलेले वैशिष्ट्ये बघितले तर यामध्ये 10.25 इंच फुल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर,

ड्युअल झोन क्लायमेट कंट्रोल, मागील एसी व्हेंट्स आणि बरेच काही वैशिष्ट्ये देण्यात आलेले आहेत. विशेष म्हणजे यामध्ये 1.2 लिटर क्षमतेचे डिझेल इंजिनचा पर्याय देण्यात आला. याशिवाय अनेक वैशिष्ट्ये देखील या कारमध्ये समाविष्ट आहेत.

Ajay Patil