मारुती सुझुकी ही देशातील अग्रगण्य कार उत्पादक कंपनी असून कार बाजारपेठेमध्ये या कंपनीचा कायमच नावलौकिक राहिलेला आहे. या कंपनीच्या माध्यमातून आतापर्यंत अनेक नवनवीन कार मॉडेल लॉन्च करण्यात आलेले असून प्रत्येकामध्ये वेगवेगळे अशी आकर्षक वैशिष्ट्ये देण्यात आलेले आहेत.
या वर्षाच्या सुरुवातीलाच मारुती सुझुकीच्या माध्यमातून एक नवीन जनरेशन स्विफ्ट लाँच करण्यात आलेली आहे व तिची किंमत सात लाख रुपये पर्यंत इतके आहे. या किमतीत या कारमध्ये बरेच फीचर ऑफर करण्यात आलेले आहेत. स्विफ्ट मध्ये अनेक सेफ्टी फीचर्स देखील वाढवण्यात आलेले आहे व आता ही भारतातील प्रसिद्ध असलेल्या कारपैकी एक आहे.
कंपनीच्या माध्यमातून या कारची डिलिव्हरी देखील सुरू करण्यात आलेली आहे. परंतु मारुतीच्या माध्यमातून ही नवीन स्विफ्ट लॉन्च झाल्यानंतर जुनी स्विफ्टची किंमत मात्र कमी करण्यात आलेली आहे. त्यामुळे तुम्हाला देखील स्विफ्ट कार खरेदी करायची असेल तर तुम्ही खूप मोठ्या प्रमाणावर पैसे आता वाचवू शकणार आहेत.
मारुती स्विफ्ट सेकंड हॅन्ड तुम्ही खरेदी करू शकतात दोन लाख पेक्षा कमी किमतीत
सध्या जर आपण सेकंड हॅन्ड कार मार्केट पाहिले तर मोठ्या प्रमाणावर विकसित होत असून यामध्ये लोकांकडून देखील सेकंड हॅन्ड कारला खूप मोठ्या प्रमाणावर मागणी येताना आपल्याला दिसून येत आहे. जर आपण गेल्या दोन वर्षाचा अहवाल बघितला तर आता लोकांना सेकंड हॅन्ड कार विकत घ्यायला परवडते व अशा कार मोठ्या प्रमाणावर विकत देखील घेत आहेत.
कमी किमतीत मिळणाऱ्या सेकंड कार या कीफायतशिर असतात आणि अनेक वर्ष तुमची चांगल्या पद्धतीने साथ देखील देतात. यामध्ये जर तुम्हाला सेकंड हॅन्ड मारुती स्विफ्ट विकत घ्यायची असेल तर तुम्ही दोन लाख रुपयेपेक्षा कमी किमतीला खरेदी करू शकता.
कुठे खरेदी करता येईल ही कार?
सध्या इंटरनेटचे युग आहे आणि प्रत्येकाजवळ स्मार्टफोन आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या हातातील स्मार्टफोनच्या मदतीने नेटचा वापर करू शकतात व देशामध्ये अशा अनेक कंपन्या आहेत की त्यांच्या वेबसाईटवर अशा सेकंड हॅन्ड कार ची नोंदणी केलेली असते या ठिकाणाहून तुम्ही अशा पद्धतीने सेकंड हॅन्ड कार खरेदी करू शकतात.
जर आपण देशातील अशा वेबसाईट किंवा कंपनी पाहिल्या तर त्यामध्ये बाईकवाले एक महत्त्वाची वेबसाईट आहे व या माध्यमातून तुम्ही खूप चांगल्या कंडिशन मधील कार मिळवू शकतात.
या वेबसाईटवर सध्या 2015 चे मॉडेल असलेली एक स्विफ्ट विक्रीसाठी उपलब्ध असून तिची किंमत दोन लाख 80 हजार रुपये पर्यंत आहे.महत्त्वाचे म्हणजे ही कार खूप कमी चाललेली आहे. जर तुम्ही दिल्लीत राहत असाल तर तुम्ही ही कार आजच खरेदी करू शकतात. सफेद रंगाची असलेली ही कार दिसायला देखील खूपच आकर्षक आहे.
मारुती स्विफ्ट मिळेल दोन लाख पेक्षा कमी किमतीत
याशिवाय या ठिकाणी 2013 ची एक मारुती स्विफ्ट देखील विक्रीसाठी उपलब्ध असून तिची विक्री किंमत एक लाख 60 हजार रुपये आहे. ही कार आतापर्यंत एक लाख किलोमीटर पेक्षा जास्त चालली आहे.परंतु कंडिशन चांगली आहे. तुम्ही या कारला विकत घेऊन काही वर्षांपर्यंत आरामात चालू शकतात.
तसे पाहायला गेले तर या कारची किंमत एका बाईकची जितकी किंमत असते तितकी आहे. परंतु जर तुम्हाला ही कार खरेदी करायची असेल तर त्या अगोदर तुम्ही टेस्ट ड्राईव्ह करून या कारची इंजिन आणि कंडिशन स्वतः तपासून घेणे गरजेचे आहे.