Ajab gajab News : सोशल मीडीयावर तुम्ही अनेकवेळा आश्चर्यजनक बातम्या वाचल्या असतील, ज्यातुन तुम्हाला धक्का बसला असेल. आजही आम्ही तुम्हाला अशीच एक बातमी घेऊन आलो आहे.

सध्या सोशल मीडीयावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये लाल रंगाची नदी वाहत आहे. हा व्हिडिओ पाहून लोकांना धक्का बसला आहे.

पेरू या देशामध्ये लाल रंगाची नदी पाहून रक्ताची ही नदी वाहत असल्याचा भास होतो. सोशल मीडियावर लाल पाण्याचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांना प्रश्न पडतो की नदीचे पाणी रक्तासारखे कसे झाले?

पेरूमध्ये रक्ताची नदी वाहताना दिसली

या व्हायरल व्हिडिओमध्ये लाल रंगाची नदी दिसत आहे. लाल रंगाची नदी तुम्ही यापूर्वी कधीही पाहिली नसेल. या व्हिडिओमध्ये पेरूमध्ये एक नदी प्रचंड वेगाने वाहत असल्याचे दिसत आहे. दरीतून वाहणाऱ्या या नदीचा व्हिडिओ जुना असला तरी तो पुन्हा एकदा व्हायरल होत आहे.

कुस्कोच्या या नदीत विटांच्या लाल रंगासारखे पाणी वाहताना दिसते, जे दिसायला अप्रतिम दिसते. विविध थरांमध्ये असलेल्या खनिज घटकांमुळे नदीचे पाणी लाल झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. हे प्रामुख्याने लोह ऑक्साईडच्या उपस्थितीमुळे होते.

लोकांना व्हिडिओ आवडला

रक्ताचा लाल प्रवाह असलेली ही नदी स्थानिक भाषेत पुकामायु म्हणून ओळखली जाते. क्वेचुआ भाषेत ‘पुका’ म्हणजे लाल आणि ‘मायु’ म्हणजे नदी. ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर @ Prachi_Ras नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

आतापर्यंत हा व्हिडिओ 3.6 मिलियन म्हणजेच 36 लाख वेळा पाहिला गेला आहे. त्याचबरोबर या व्हिडिओला 82 हजारांहून अधिक यूजर्सनी लाइक केले आहे.