Ahmednagar News : जेवणात लसणाशिवाय कोणत्याही ‘भाजीचा विचार करणे अशक्यच पण सध्या लसणाची फोडणी अजून काही दिवस तरी महागच राहणार आहे.
आवक कमी होत असल्याने लसणाच्या किमतीत विक्रमी वाढ झाली असून अद्यापही ती कमी होत नसल्याचे चित्र दिसत आहे.
कांद्याप्रमाणेच लसणाची लागवड खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामात केली जाते. खरीप लसणाची जून- जुलैमध्ये लागवड करून ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये काढणी केली जाते,
तर रब्बी पिकासाठीची लागवड सप्टेंबर-नोव्हेंबरमध्ये केली जाते आणि मार्च-एप्रिलमध्ये त्याची कापणी केली जाते.
पण, मागच्या वर्षी ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झाल्याने पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. परिणामी उत्पादनात मोठी तूट आली आहे.
त्यामुळे यंदा लसणाचे उत्पादन कमी झाले असून अद्याप नवीन लसूण बाजारात येण्यास बराच कालावधी लागणार आहे.
त्यामुळे बाजारात लसणाला मोठ्या प्रमाणावर मागणी वाढल्याने लसणाचे दर चांगलेच वाढलेले आहेत. त्यातच उन्हाळ्याची चाहूल लागली असल्याने ग्रामीण भागात पाण्याची टंचाई जाणवत आहे.
त्यामुळे भाजीपाल्याच्या आवकेवर देखील परिणाम होत असून फळभाज्यांचे दर देखील वधारलेले आहेत. तसेच लिंबाला चांगला भाव मिळत आहे.
अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीत मिळालेले दर टोमॅटो ४०० २२००, वांगी ५०० – २२००, फ्लावर १५००- ५०००, कोबी ५०० १८००, काकडी ५०० – २२००, गवार ६०००- १४०००, घोसाळे २००० – ४०००, दोडका ४००० – ६०००, कारले ३००० – ४०००, भेंडी २००० ३०००, वाल १००० – २५००, घेवडा ३५०० ४०००,
तोंडुळे १५०० – २०००, डिंगरी १००० – २५००, बटाटे ७०० १८००, लसूण ९००० – ३०,०००, हिरवी मिरची २५०० ४०००, आवळा १५०० – २२००, शेवगा २००० ३५००, लिंबू २००० ७५००, आद्रक ३००० – ७०००, गाजर १०००- १८००,
दु.भोपळा ५०० – १४००, शिमला मिरची १५०० – २५००, मेथी ६०० ८००, कोथिंबीर ६०० २१००, पालक ६०० – १०००, मुळे १४०० – १४००, कांदा पात ९०० – १५००, हरभरा १२००- १५००.