Ahmednagar News : यंदा मान्सूनच्या पावसाने ऐनवेळी दगा दिल्याने इतर पिकांसोबतच लसणाची देखील लागवड कमी प्रमाणात झाली होती. परिणामी उत्पादनाम मोठी तूट आली आहे. त्यातच परत आक्टोबर नोव्हेंबरमध्ये अवकाळीचा फटका बसला.
त्यात देखील मोठ्या प्रमाणावर शेतमालाचे नुकसान झाले, यात लसणाचे देखील पीक भुईसपाट झाले होते. त्यामुळे यंदा लसणाचे उत्पादन कमी झाले असून अद्याप नवीन लसूण बाजारात येण्यास कालावधी लागणार आहे.
त्यामुळे बाजारात लसणाला मोठ्या प्रमाणावर मागणी वाढल्याने लसणाचे दर चांगलेच वाढलेले आहेत. किरकोळ बाजारात तब्बल ४०० रूपये भाव मिळत आहे. त्यापाठोपाठ गवारीच्या शेंगाला २०० रूपये किलोने विकल्या जात आहेत. शेतकऱ्यांच्या हातात मात्र अत्यंत कमी पैसे मिळत आहेत.त्यामुळे दर वाढून देखील शेतकरी उपाशीच असल्याचे चित्र आहे.
अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीत मिळालेले दर : टोमॅटो १००० २२००, वांगी ५०० -३०००, फ्लावर ५०० २०००, कोबी ५०० – २२००, काकडी २०० २०००, गवार ६००० १२००, घोसाळे २०००- ३५००, दोडका ३०००- ६०००, कारले २००० ४५००, भेंडी २००० – ४०००, वाल १००० ३०००, घेवडा २००० ४०००, तोंडुळे २००० २५००, डिंगरी १००० – २०००, बटाटे ५०० – १४००, लसूण १५००० ३०,०००, –
हिरवी मिरची ३००० ५०००, आवळा २००० ३०००, शेवगा ३००० – ५५०००, लिंबू २००- ६०००, आद्रक ५००० ८०००, दु.भोपळा ५०० १५००, शिमला मिरची २००० ४०००, मेथी ४००० – ५००, कोथिंबीर ३०० – ६००, पालक ४०० – ६००, करडी भाजी ३०० ७००, मुळे ५०० – १०००, कांदा पात १५०० – २४००. कांदा १०० ते १५०० रूपये
सोमवारी झालेल्या लिलावात कृषी उत्पन्न बाजार समितीत ८८, ०२७ गोणी म्हणजेच ४८, ४१५ क्विंटल लाल कांद्याची आवक झाली होती. यातील १ नंबर कांद्याला १०५० १५००, २ नंबर ५५०-१०५०, ३नंबर २५० – ५५०, ४ नंबर १०० – २५० असा दर मिळाला.