Agricultural News : आवक वाढल्याने शेवग्याचे भाव कोसळले

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Agricultural News ; शेवग्याच्या शेंगांची आवक वाढल्याने गेल्या महिनाभराच्या तुलनेत शेवग्याचे भाव निम्म्यापेक्षा अधिक उतरले आहेत. आता अवघ्या २० रुपयाला एक किलो शेंग विकण्यात येत आहेत. मागील पंधरवड्यात शेवग्याचा भाव वधारला होता.

एक किलो शेवग्याच्या शेंगांला सधारणपणे ६० ते ८० रूपये मिळत होते. त्यानंतरही खवय्ये ती खरेदी करत होते. आता भाव मोठ्या प्रमाणात प्रमाणत उतरले आहेत. यंदा वातावरणातील बदलांमुळे या झाडांना बहर चांगल्या प्रमाणात आला आहे.

त्यामुळे सध्या शेवग्याची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. त्यामळे शेवग्याचे भाव कोसळले आहेत.

अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीत मिळालेले दर :

टोमॅटो २०० – २०००, वांगी ३०० – ३०००, फ्लावर ५०० ३०००, कोबी ५०० १८००, काकडी २०० १५००, गवार ३००० – १००००, घोसाळे २००० ३५००, दोडका २००० – ५०००, कारले २००० – ४०००, भेंडी १५०० – ३५००, वाल २००० – ४५००, घेवडा २००० – ४५००, तोंडुळे १५०० – ३०००, डिंगरी १००० – २५००, बटाटे ६०० – २०००, लसूण ७०००- १३०००,

हिरवी मिरची ४००० ७५००, आवळा २००० ३०००, शेवगा १००० २०००, लिंबू २००० – ९०००, आद्रक ६००० १०,०००, गाजर १०००- १३००, दु.भोपळा ५०० १७००, शिमला मिरची २०००- ४०००, मेथी ८०० १६००, कोथिंबीर १२०० – १४००, पालक ८०० – १२००,मुळे १००० – २०००, कांदा पात १६०० – २०००, हरभरा १०००- १०००.