Gold-Silver Rate Today:- गेल्या काही दिवसांपासून जर आपण बघितले तर सोने आणि चांदीच्या दराने उच्चंकी पातळी गाठल्याचे दिसून येत आहे व त्यामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये घसरण तसेच वाढ झालेली देखील पाहायला मिळत आहे. मध्यंतरीच्या काही कालावधी सोडला तर बरेच दिवसापासून सोन्या चांदीच्या दराने उच्चंकी पातळी गाठल्याचे आपल्याला दिसून येते.
त्यामुळे लग्नसराईच्या हंगामामध्ये सोने चांदीची खरेदी ही सर्वसामान्यांच्या आवाक्याच्या बाहेर गेल्याचे सध्या चित्र आहे. नुकत्याच महाराष्ट्र आणि झारखंड मधील निवडणुका पार पडल्या व निकाल देखील जाहीर झाले. परंतु त्यानंतर मात्र सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळत आहे.
जर आपण आज म्हणजेच 25 नोव्हेंबर 2024 रोजी सोन्या-चांदीचे दर बघितले तर त्यामध्ये एक हजार रुपयांनी घट आल्याचे दिसून येत आहे. 18 ते 24 नोव्हेंबर च्या कालावधीमध्ये सतत दरवाढ झाल्यानंतर मात्र आज काही प्रमाणात सोन्याचे दर घसरले असल्याचे चित्र आहे व चांदी देखील एक हजार रुपयांपेक्षा अधिक दराने स्वस्त झाली आहे. परंतु येणाऱ्या काही दिवसात परत सोन्याने चांदीच्या दरात वाढ होईल अशी देखील शक्यता या क्षेत्रातील तज्ञांनी व्यक्त केली आहे.
आज किती आहेत देशातील सोन्या-चांदीचे दर?
इंडियन बुलियनच्या वेबसाईट नुसार जर आपण बघितले तर आज देशातील सोन्या-चांदीचे दर निचांकी पातळीवर आले आहेत. आज दहा ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचे दर 76 हजार 780 रुपये तर एक किलो चांदीचे दर 86 हजार 640 रुपये इतके आहेत.
22 कॅरेट सोन्याचा आजचा दर बघितला तर तो 70473 रुपये इतके आहेत.जर आपण या महिन्याच्या दरांची तुलना केली तर आज जवळपास 1180 रुपये प्रतितोळे सोने स्वस्त झाले आहे व एक किलो चांदीच्या दरात तब्बल किलोमागे 1430 रुपयांची घट झाली आहे.
महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील सोन्याचे आजचे दर
1- पुणे- पुणे शहरात आज प्रतिदहा ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याचे दर 70382 असून 24 कॅरेट सोन्याचा दर 76 हजार 780 रुपये इतका आहे.
2- नागपूर- नागपूर या ठिकाणी प्रति दहा ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याचा दर 70382 तर 24 कॅरेट सोन्याचा दर 76,780 रुपये इतका आहे.
3- मुंबई- मुंबईला आज 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 70382 असून 24 कॅरेट सोन्याचे दर प्रतितोळा 76 हजार 780 रुपये इतके आहेत.
4- नासिक- नासिक येथे 22 कॅरेट दहा ग्रॅम सोन्याचे दर 70382 रुपये असून 24 कॅरेट सोन्याचे प्रतितोळा दर हे 76,780 रुपये इतके आहेत.