बाजारभाव

लसणाची फोडणी अन वांग्याचे भरीत झाले महाग…!

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर : मेथी, पालक, शेपू आणि शेवगा,वांगी, गवारीच्या शेंगांना अधिक मागणी आहे. मात्र हवामानाचा फटका बसल्याने भाजीपाल्याची आवक कमी होत असल्याने भाजीपाल्याचे दर चांगलेच वाढलेले आहेत. सध्या वांगी , गवार, लसूण यांना सर्वाधिक दर मिळत आहे.

यंदा पावसाचे प्रमाण सरसरीच्या तुलनेत कमी झाले. त्यामुळे अनेक भागात सध्या पाणी टंचाई सुरू झाली आहे. त्यामुळे शहरात बाहेरून येणारा भाजीपाला कमी येत आहे.

त्यातच आता लसणाचे भाव किरकोळ बाजारात ३०० रुपयांवर पोहचल्यानंतर लसणाची फोडणी महागली आहे. नवीन लसूण बाजारात येण्यास असून एक ते दीड महिन्यांचा अवकाश आहे. लसणाची नवीन हंगाम सुरु होईपर्यंत तेजी कायम राहणार आहे. त्यामुळे गृहिणींना संसाराचा गाडा काटकससरीने हाकावा लागत आहे.

राज्यात लसणाचे उत्पादन घटले असून, परराज्यातील आवकही कमी झाली आहे. त्यामुळे घाऊक बाजारात लसणाचे दर १५० ते २५० रुपयांवर पोहचले असून, किरकोळ बाजारात हेच दर २६० ते ३०० रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहचले आहेत.

महाराष्ट्रातील गावरान लसणाच्या लागवडीत गेल्या काही वर्षापासून घट झाली आहे.त्यामुळे परराज्यातील लसून उत्पादनावर अवलंबून राहावे लागत आहे. आज सर्वच बाजारपेठेत परराज्यातील आवक कमी झाली असून लसणाला मोठी मागणी आहे. मागणीच्या तुलनेत आवक कमी प्रमाणात होत असल्याने लसणाचे दर वधारले आहेत.

भाज्यांचे दर : टोमॅटो ६०० – २८००, वांगी २००० – ८०००, फ्लावर ७०० – ४५००, कोबी ५०० – १५००, काकडी ३०० – २०००, गवार ६००० – १२०००, घोसाळे २००० – ४०००, दोडका १००० – ५०००, कारले ४००० – ६०००, भेंडी २००० – ६०००, वाल २५०० – ५५००, घेवडा २५०० – ३२००, तोंडुळे १५०० – ३२००, डिंगरी १५०० – ४०००, बटाटे ५०० – १९००, लसूण १३००० – २५०००, हिरवी मिरची २००० – ४५००, आवळा २००० – ३५००, शेवगा ३५०० – ७०००, लिंबू ५०० – १५००, आद्रक ५००० – ८०००, दु.भोपळा ६००० – २०००, शिमला मिरची ३००० – ५०००, मेथी २४०० – ३६००, कोथिंबीर १८०० – १९००, पालक १००० – २०००, करडी भाजी १५०० – २५००, मुळे १५०० – ३०००, कांदा पात १६०० – २२००.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office