बाजारभाव

गवारीने खाल्ला भाव ; शेवगा व कारले यांचेही भाव भिडले थेट गगनाला

Published by
Sushant Kulkarni

२४ जानेवारी २०२५ अहिल्यानगर : येथील बाजार समितीत गवारीचा क्विंटलचे भाव गगनाला भिडले आहेत.तब्बल आठ ते चौदा हजार रुपये क्विंटलला भाव गवारीला आहे.त्या खालोखाल शेवगा व कारल्याचेही भाव मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहेत.कारल्याला दोन हजार रुपये व तांदळेला तीन हजारांचा बाजार भाव आहे.

त्याचबरोबर लसून, शेवगा व टॉमेटोचे बाजारभाव टिकून आहेत.बाजारात लसणाची आवक कमी असल्याने लसनाचे भाव मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहेत. तसेच शेवगा, गवार व टॉमेटोचे बाजार भाव स्थिर आहेत.याच बरोबर पालेभाज्यांचे बाजारभार टिकून आहेत.गेल्या आठवड्यापासून पुन्हा थंडी सुरू झाली आहे.

याचा परिणाम पालेभाज्यांवर झाला आहे. बाजारात पालेभाज्यांची आवक अद्यापही जास्त आहे. यामुळे पालेभाज्यांचे भाव मोठ्या प्रमाणावर कमी झालेले आहेत. येथील बाजार समितीत मिळालेले दर पुढीलप्रमाणे :

टोमॅटो २०० ते १५००, वांगी ५०० ते ४०००, फ्लावर, ३०० ते २०००, कोबी २०० ते १२००, काकडी ५०० ते २८००, गवार ८००० ते १४०००, घोसाळे १५०० ते ४०००, दोडका १५०० ते ५०००, कारले २००० ते ५०००, हळद ४००० ते ४०००, कैरी २००० ते १८००, भेंडी १५०० ते ५०००, वाल १००० ते ५०००, घेवडा १५०० ते ४०००, तांदुळे १५०० ते ५०००, डिंगरी ३००० ते ३०००, बटाटे ५०० ते २४००, लसून २५०० ते २१०००

हिरवी मिरची २००० ते ७८००, पकांडा ५००० ते ६०००, आवळा २००० ते २५००, शेवगा १५०० ते ९०००, ढेमसे २५०० ते २५००, लिंबू १००० ते ५५००, आद्रक २१०० ते ३५००, गाजर १००० ते २५००, दुधी भोपळा ४०० ते २०००, मका कणसे ५०० ते १७००, शिमला मिरची ८०० ते ४०००, मेथी ८०० ते २०००, कोथंबिर ९०० ते ३३००, पालक १००० ते १२००, करडई भाजी १८०० ते २५००, शेपू भाजी १८०० ते २०००, पुदीना ३००० ते ३०००, चवळी २५०० ते ३०००, बीट १००० ते २५००

हरभरा १४०० ते १४००, वाटाणा १५०० ते ४०००, डांगर १००० ते १५००, कांदापात १६०० ते २२००, बांलंटी ४००० ते ५०००. त्याच बरोबर मोसंबी ५०० ते ६०००, संत्रा १००० ते ६५००, डाळींब २००० ते २०५००, पपई ५०० ते २०००, सिताफळ १००० ते ५०००, रामफळ ४०००, ६०००, नारळ २००० ते २५००, अननस २२०० ते ५०००, चिकू १५०० ते ५०००, द्राक्षे ४५०० ते १००००, अॅपल बार ५०० ते ३५००, सफरचंद ९५०० ते १२५००, पेरू ५०० ते ४०००, कलिंगड १००० ते २२००

खरबुज १००० ते ३०००, कडाळा १५०० ते ४०००, चमेली १२००, २५००, खिरणी २००० ते ९०००, केव्ही २००० ते २०००, गावराण बोरं १५०० ते ३०००, अॅपल बोरं १००० ते २०००, केळी १३०० ते २१००, स्टोबेरी २००० ते ३५०००, चेकनर ४००० ते ६०००, इगण ९००० ते १२५०० आदी.

Sushant Kulkarni