बाजारभाव

सोन्याच्या दरात घसरण तर चांदीच्या दरात प्रतिकिलो 553 रुपयाने वाढ! सोने खरेदी करण्याअगोदर वाचा आजचे बाजार भाव

Published by
Ajay Patil

Gold-Silver Price Today:- जर आपण गेल्या वर्षाचा विचार केला तर सोन्या आणि चांदीच्या किमतींमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाल्याचे आपल्याला दिसून आले. मागच्या वर्षीचा अर्थसंकल्प जेव्हा सादर करण्यात आला व त्यावेळी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोन्यावरील आयात शुल्कात कपात केली होती व त्याच दिवशी सोने आणि चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळाली होती. त्यानंतरच्या कालावधीत मात्र सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा वाढ पाहायला मिळाली.

आजपर्यंत जर बघितले तर सोने आणि चांदीच्या दरामध्ये काहीशा प्रमाणात चढउतार असल्याचे आपल्याला दिसून येते. एक जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2024 या एक वर्षाच्या कालावधीत जर आपण बघितले तर सोन्याच्या किमतींमध्ये साधारणपणे 20.22% ची वाढ झाली.

मागच्या वर्षी एक जानेवारी 2024 रोजी 24 कॅरेट एक तोळा सोन्याची किंमत 63 हजार 352 रुपये होती व त्यामध्ये एका वर्षात 12,810 रुपयांनी वाढ होऊन प्रति तोळा सोने 76,162 रुपये झाले. तशीच परिस्थिती चांदीची देखील होती.

एक जानेवारी 2024 रोजी चांदी प्रतिकिलो 73 हजार 395 होती व पूर्ण वर्षात चांदीच्या दरात 12,622 रुपयांनी वाढ होऊन वर्षाच्या शेवटच्या दिवशी चांदीचे दर 86 हजार सतरा रुपये प्रतिकिलो होते. म्हणजेच 17.19 टक्क्यांनी चांदीच्या दरात एका वर्षात वाढ झाली.

आज काय आहेत सोन्या-चांदीचे दर?
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या अनुषंगाने बघितले तर आज दहा ग्रॅम 24 कॅरेट सोन्याच्या दरात 556 रुपयांची घसरण झाली व तो 76 हजार 948 रुपयांवर आला असून शुक्रवारी 77 हजार पाचशे चार रुपये प्रति तोळा इतका होता.

तसेच चांदीच्या दरात मात्र आज काहीशी वाढ झाली व चांदीचे दर प्रतिकिलो 553 रुपयांनी आज वाढले व चांदीचे आजचे दर 87,568 रुपये प्रति किलो इतका झाला आहे. जर आपण शुक्रवारी बघितले तर चांदीचे दर 88,121 रुपये प्रतिकिलो इतके होते.

गेल्या वर्षीचे सोन्या-चांदीचे उच्चांकी दर
गेल्या वर्षीचे सोने आणि चांदीचे उच्चांकी दर जर बघितले तर 30 ऑक्टोबर रोजी सोन्याने 79 हजार 681 रुपये प्रतितोळा इतका उच्चांक गाठला होता. तर 23 ऑक्टोबर 2024 रोजी चांदीच्या दरात 99151 रुपये प्रतिकिलो इतका उच्चांक पाहायला मिळाला होता.

Ajay Patil