Gold-Silver Price:- सध्या संपूर्ण देशातील जर आपण सराफा बाजारांचे चित्र पाहिले तर सोने आणि चांदीचे दर गगनाला पोहोचलेले आहेत व त्यामुळे सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांचे खिशाचे बजेट बिघडले आहे. कधी नव्हे एवढ्या उच्चांकी पातळीवर सध्या सोने आणि चांदीचे दर आहेत.
जर आपण या आठवड्याच्या शेवटच्या दिवसाचा विचार केला तर गेल्या 24 तासात सोन्याचे दर चार वेळा घसरले व त्यामुळे सध्या तरी सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या चेहऱ्यावर उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. परंतु आजच्या दिवसाचा विचार केला तर सोने आणि चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांकरिता एक आनंदाची बातमी आहे.
आज शनिवारी बाजार उघडताच सोन्याच्या दरामध्ये घसरण नोंदवली गेली व उच्चांकी पातळीवर असलेले सोने आणि चांदीमध्ये किंचित स्वस्ताई आली. त्यामुळे सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे आतापर्यंतच्या उच्चांकावरून स्वस्त किमतीत सोने खरेदी करण्याची ग्राहकांना सुवर्णसंधी मिळाली आहे.
काय आहेत आजचे सोने आणि चांदीचे दर?
आजचे सोन्याचे दर पाहिले तर दहा ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत आज 71410 असून मागील ट्रेडमध्ये सोन्याची किंमत 73 हजार 390 रुपये प्रति दहा ग्रॅम वर बंद झाली होती. जर आपण बुलियन मार्केटची वेबसाईट बघितली तर त्यानुसार चांदीचे दर देखील 89 हजार दोनशे रुपये प्रति किलो प्रमाणे असून मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत 94 हजार 270 रुपये प्रति किलो होती.
वाचा महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील सोन्याचे आजचे बाजार भाव
1- मुंबई शहर- 22 कॅरेट सोन्याची दहा ग्रामची किंमत 65 हजार 340 रुपये आहे. तर मुंबईमध्ये 24 कॅरेट सोन्याची आजची किंमत 71 हजार 280 प्रति दहा ग्राम इतके आहे.
2- पुणे शहर- पुणे शहरांमध्ये आज 22 कॅरेट दहा ग्रॅम सोन्याचा दर 65 हजार 340 रुपये असून 24 कॅरेट सोन्याचा दर 71280 रुपये आहे.
3- नागपूर शहर- महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूर मध्ये आज 22 कॅरेटच्या दहा ग्राम सोन्याचा दर 65 हजार 340 रुपये असून 24 कॅरेट सोन्याचा दर 71 हजार 280 रुपये इतका आहे.
4- नाशिक शहर- नासिक या ठिकाणी आज दहा ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 65 हजार तीनशे चाळीस रुपये असून 24 कॅरेट सोन्याचे दर 71 हजार 280 रुपये प्रति दहा ग्राम इतका आहे.
काय आहे 24 आणि 22 कॅरेट सोन्यातील फरक?
जर आपण 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्यातील फरक पाहिला तर यामध्ये शुद्धतेच्या बाबतीत फरक येतो. 24 कॅरेट सोने हे 99.9% शुद्ध असते आणि 22 कॅरेट हे अंदाजे 91% पर्यंत शुद्ध असते. 22 कॅरेट सोन्यामध्ये तांबे, चांदी, जस्त यासारख्या नऊ टक्के इतर धातूंचे मिश्रण असून त्यापासून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने हे 99.9% शुद्ध असते तरी त्याच्या दागिने बनवता येत नाही. बहुतेक सराफ बाजारातील दुकानदार 22 कॅरेट मध्ये सोन्याची विक्री करतात.