बाजारभाव

शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज ! कापूस बाजारभावात सुधारणा, आज मिळाला ‘एवढा’ भाव, भविष्यात कशी राहणार बाजाराची परिस्थिती ?

Published by
Ahmednagarlive24 Office

Cotton Rate : पांढरे सोने म्हणून ओळखले जाणारे कापूस बाजार हंगामाच्या अगदी सुरुवातीपासूनच दबावात आहेत. कापसाला बाजारात अपेक्षित असा भाव मिळत नसल्याचे चित्र पाहायला मिळतं आहे. मध्यँतरी तर कापसाला हमीभावापेक्षा कमी दर मिळाला होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून कापूस बाजारभावात सुधारणा पाहायला मिळत आहे.

विशेष म्हणजे आज देखील बाजारभावात सुधारणा झाली आहे. देशातील बाजारात कापसाच्या भावातील सुधारणा कायम असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव पाहायला मिळाले आहेत. बाजार अभ्यासकांनी दिलेल्या माहितीनुसार, बाजारातील आवक दिवसेंदिवस कमी होत आहे. याचा आधार कापूस बाजाराला मिळत आहे.

आज देशातील अनेक बाजारात कापसाचा कमाल भाव ७ हजार ५०० रुपयांवर पोहचला होता. राज्यातही आज देऊळगाव राजा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पांढऱ्या सोन्याला साडेसात हजाराचा कमाल भाव मिळाला आहे. दुसरीकडे सरासरी बाजारभावाचा विचार केला असता या मार्केटमध्ये कापसाला सात हजार 250 रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी भाव मिळाला आहे.

दरम्यान, शेतकऱ्यांच्या माध्यमातून आगामी काळात कापसाचे भाव कसे राहणार हा मोठा सवाल उपस्थित केला जात आहे. जाणकार लोकांनी म्हटल्याप्रमाणे, कापसाला चांगली मागणी असल्याने कापसाचे भाव यापुढील काळातही कायम राहतील. तसेच बाजारातील आवक कमी होत गेल्यानंतर दरात आणखी वाढ होईल, असा अंदाज आहे.

महाराष्ट्रातील बाजारात काय दर मिळाला ?

राळेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज कापसाला किमान 6500 कमाल 7220 आणि सरासरी सात हजार 100 एवढा भाव मिळाला आहे.

पारशिवनी कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज कापसाला किमान 6550, कमाल 6800 आणि सरासरी 6725 रुपये एवढा भाव मिळाला आहे.

अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती : मार्केटमध्ये आज पांढरे सोने 7000 रुपये प्रति क्विंटल या भावात विकले गेले आहे.

देऊळगाव राजा एपीएमसी : या मार्केटमध्ये आज कापूस किमान 6500, कमाल 7500 आणि सरासरी 7250 या भावात विकले गेले असे.

हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समिती : आज राज्यातील या बाजारात कापसाला कमाल 7310, किमान 6000 आणि सरासरी 6500 हा भाव मिळाला आहे.

Ahmednagarlive24 Office