बाजारभाव

सर्वसामान्यांसाठी आनंदवार्ता! तूर डाळीचे दर गडगडले; प्रतिकिलो ‘इतकी’ झाली स्वस्त

Published by
Sushant Kulkarni

Tur-Dal Market Price:- सध्या महागाईने प्रत्येक क्षेत्रात डोके वर काढले असून यामुळे सर्वसामान्य जनता मात्र मोठ्या प्रमाणावर त्रस्त झाल्याची स्थिती आहे. दैनंदिन वापराच्या अनेक गोष्टींमध्ये प्रचंड महागाई मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे सर्वसामान्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.

परंतु यामध्ये जर आपण तुरीचे दर पाहिले तर ते दहा ते अकरा हजार रुपये क्विंटल पर्यंत होते व काही दिवसांपासून तुरीच्या दरामध्ये घसरण सुरू झाली व त्यामुळे दैनंदिन वापरामध्ये महत्त्वाचे असलेली तुरदाळ देखील आता स्वस्त होण्याची शक्यता आहे. सध्या जर तुरीची आवक बघितली तर बाजारामध्ये नवीन हंगामातील तुरीची आवक सुरू झालेली नाही.

परंतु यावर्षी संपूर्ण भारतामध्ये चांगला पाऊस झाल्यामुळे महाराष्ट्र आणि कर्नाटक सारख्या राज्यांमध्ये तुरीचे विक्रमी उत्पादन आले आहे. देशांतर्गत जर तुरीची मागणी बघितली तर ती 42 लाख टन इतकी आहे व तितके उत्पादन देशातच होण्याची शक्यता यावर्षी आहे.

त्यात भर म्हणून आणखीन इतर देशातून दहा लाख टन तुर आयातीचे करार देखील करण्यात आलेले आहेत. त्यामुळे साहजिकच तुरीचा साठा हा मागणीपेक्षा जास्त होणार असल्याने तुरीचे दर घसरण्याची शक्यता असल्याने साहजिकच त्यामुळे तुरीची डाळ देखील स्वस्त होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

तूरडाळ किलोमागे झाली 40 रुपयांनी स्वस्त

जर आपण सांगली शहरातील बाजार बघितला तर त्या ठिकाणी तूर डाळीचे दर प्रतिकिलो चाळीस रुपयांनी घसरले आहेत व इतकेच नाही तर त्यासोबत मूग तसेच मसूर व हरभरा डाळीचे दर देखील घसरले आहेत. सांगली बाजार समितीमध्ये क्विंटलला तूर डाळीचा दर 13500 होता. जो त्याच्या पंधरा दिवसांपूर्वी 17 हजार पाचशे रुपये होता. किरकोळ बाजारात तूर डाळीचे दर 190 रुपये किलो पर्यंत पोहोचले होते व त्यामध्ये आता घट होऊन चक्क तूर डाळीचे दर दीडशे रुपये प्रतिकिलो पर्यंत खाली आले आहेत.

हरभरा, मसूर तसेच मूग डाळीची स्थिती

सणासुदीच्या कालावधीमध्ये आपण बघितले होते की हरभरा डाळ 110 रुपये किलोपर्यंत होती व त्यामध्ये देखील आता घसरण झाली असून हरभरा डाळीचे दर वीस रुपयांनी खाली आले आहेत. तसेच मसूर डाळ 90 रुपये किलोवर स्थिर आहे तर मूग डाळीचे दर देखील प्रति किलो दहा ते पंधरा रुपयांनी घसरले आहेत.

Sushant Kulkarni

Published by
Sushant Kulkarni