अहमदनगर जिल्ह्यात ह्या ठिकाणी कांद्याचे भाव उतरले

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राहुरी येथील मुख्य आवारातील कांदा मोंड्यावर ४१ हजार ६११ कांदा गोण्यांची आवक होऊन चांगल्या प्रतीच्या कांद्यास २२०० ते २५०० रुपये क्विंटल भाव मिळाला.

हाच भाव दोन दिवसांपूर्वी झालेल्या लिलावात २५०० ते ३००० रुपये मिळत होता. पण काल शनिवारी १९ ऑगस्ट रोजी अचानक कांद्याच्या वाढत असलेल्या भावावर नियंत्रण आणण्यासाठी कांदा निर्यात शुल्क ४० टक्के वाढविल्याने त्याचा मोठा फटका कांदा मोंड्यावर होऊन कांद्याचे भाव ५०० रुपयांनी कमी झाले.

राहुरीत कांदा मोंढा सुरु असताना भाव कमी झाल्याच्या निषेधार्थ काही लिलाव बंद पाडले होते. बाजार समितीच्या राहुरी येथील कांदा मोंड्यावर लिलावास आलेल्या कांद्याचे प्रतवारीनुसार

मिळालेले भाव पुढीलप्रमाणे- एक नंबर कांद्यास १८०१ ते २२०० रुपये भाव मिळाला, तर दोन नंबर कांद्यास १३०१ ते १८०० रुपये, तीन नंबर कांद्यास २०० ते १३०० रुपये, गोल्टी कांद्यास ४०० ते १९०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला, तर काही अपवात्मक गोण्या २३०० ते २५५० रुपये क्विंटलने विकल्या गेल्या.