Ahmednagar Onion Price : जिल्ह्यातील ह्या बाजार समितीत कांदा २३५१ रुपये

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar Onion Price : अकोले येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला २३५१ रुपये दर मिळाला. बाजार समितीमध्ये गुरुवारी २८७५ गोण्यांची आवक झाली. तसेच, मोकळा कांदा आवक झाली असून, एक नंबर कांद्यास १८५१ ते २३५१, दोन नंबर कांद्यास १२५१ ते १८५१, तर तीन नंबर कांद्यास ८०० च्या पुढे बाजार भाव मिळाला.

गोल्टी ७००, तर खाद ३५० पर्यंत विक्री झाली. बाजार आवारात रविवार, मंगळवार, गुरुवार या तीन दिवशी लिलाव होत आहेत. शेतकरीवर्गाच्या विक्रीस आलेल्या कांद्यास योग्य बाजारभाव मिळत आहेत.

कांद्यासाठी चांगले बाजारभाव मिळत असून, गोणीच्या खर्चात बचत होत आहे. कांदा लिलाव वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने कांदा वजन लिलावाच्या दिवशी सकाळी ८ ते ३ वाजेपर्यंत लिलाव केले जातात.

कांदा उत्पादकांनी विक्री करताना, त्याचे पूर्ण नाव, गाव व इतर माहिती कांदाची विक्री पट्टी बनविताना बिनचूक द्यावी. शेतीमाल बाजार समितीचे मुख्य बाजारात विक्रीस आणावा, असे आवाहन सभापती भानुदास तिकांडे, उपसभापती रोहिदास भोर, संचालक व सचिव अरुण आभाळे यांनी केले आहे.

शेतकऱयासाठी जास्तीत जास्त सोयी सुविधा उपलब्ध करण्यास कटिबद्ध आहोत.. उत्पादकांनी शेतीमाल कांदा, टोमॅटो, भाजीपाला, सोयाबीन, मका, गहू, इत्यादी कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात आणावा असे आवाहन केलं आहे.