Kapus Bajarbhav : यावर्षी विजयादशमीच्या दिवशी खऱ्या अर्थाने कापूस हंगामाला सुरुवात झाली. गेल्या वर्षी कापसाला कधी नव्हे तो ऐतिहासिक उचांकी बाजार भाव मिळाला असल्याने यावर्षी कापूस लागवडीखालील क्षेत्रात वाढ झाली आहे. यावर्षी हंगामाच्या सुरुवातीला गेल्यावर्षीप्रमाणेच उच्चांकी बाजार भाव मिळाला होता.
मात्र तदनंतर कापूस बाजारभावात मोठी घसरण झाली आहे. मुहूर्ताच्या कापसाला तब्बल 16 हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंतचा बाजार भाव खानदेशात मिळाला असल्याचे मीडिया रिपोर्ट मध्ये सांगितले गेले होते. दरम्यान औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड मध्ये देखील मुहूर्ताच्या कापसाला 11 हजार रुपये प्रतिक्विंटल पर्यंतचा बाजार भाव मिळाला होता. दरम्यान महाराष्ट्रात सध्या कापसाचे बाजार भाव कमी झाले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने उघडीत दिली असल्याने कापसाचा ओलावा कमी झाला आहे. सुरुवातीला व्यापाऱ्यांकडून ओलावा अधिक असल्याचे कारण पुढे करत कापसाचे बाजार भाव हाणून पाडले जात होते. मात्र आता कापसाचा ओलावा कमी झाला तरी देखील कापसाला समाधानकारक बाजार भाव मिळत नसल्याचे चित्र आहे. आता व्यापारी लोकांकडून सूत आणि कापडाला मागणी कमी असल्याचे कारण पुढे केले जात असून कापसाचे बाजारभाव मोठ्या प्रमाणात कमी केले जात आहेत.
सध्या राज्यात कापसाला सात हजार रुपये प्रति क्विंटल ते साडेआठ हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत बाजारभाव मिळत आहे. दरम्यान जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार कापूस बाजार भाव तूर्तास जरी दबावात असले तरी देखील फेब्रुवारी पर्यंत शेतकऱ्यांना नऊ हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा सरासरी बाजार भाव मिळण्याची शक्यता आहे.
अशा परिस्थितीत शेतकरी बांधवांनी आता बाजारपेठेचा आढावा घेत आणि 9000 रुपये प्रति क्विंटल ही तर पातळी लक्षात घेऊन कापसाची टप्प्याटप्प्याने विक्री केली तर त्यांना निश्चितच फायदा होणार आहे. मित्रांनो जसं की आपणास ठाऊकच आहे की कापूस हे खरीप हंगामातील एक मुख्य पीक आहे.
या पिकावर राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून आहे. सध्या कापूस बाजार भाव दबावात आहेत मात्र फेब्रुवारी पर्यंत कापूस बाजारभावात सुधारणा होण्याची शक्यता जाणकार लोकांकडून वर्तवण्यात आली आहे. अशा परिस्थितीत शेतकरी बांधवांनी कापसाची विक्री बाजारपेठेचा आढावा घेऊन केल्यास त्यांना कापसाच्या पिकातून चांगली कमाई होण्याची शक्यता आहे.