Vegetable rates : यावर्षी लावलेला उन्हाळा आणि पाण्याची कमतरता यामुळे भाजीपाल्याचे उत्पादन घटल आहे. आवक कमी आणि मागणी वाढल्याने भाजीपाल्याचे दर वाढले आहेत. एकीकडे कडाक्याचे ऊन आणि दुसरीकडे मान्सूनचे उशिरा झालेल्या आगमनाचा परिणाम आता भाजीपाल्याच्या उत्पादनावर झाल्याचे दिसून येत आहे. भाज्यांच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर ताण आला आहे.
गेल्या एक महिन्यापासून पावसाने पूर्णपणे दडी मारल्याने खरीपाच्या पिकांची वाढ खुंटली आहे. कोरडवाहू शेतीतील पिकांनी आता माना टाकल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. आहेत ती पिके करपत आहेत यामुळे पुढील पिकांचा विषयच नाही. त्यामुळे शेतमालाचे उत्पादन मोठया प्रमाणात घटले असून परिणामी बाजारात भाजीपाल्याच्या किमती वाढत आहेत अनेक ठिकाणी सोयाबीन,
बाजरीचे पीक अक्षरश: करपू लागले असून सध्या कडक उन्हामुळे जमिनीला भेगा पडत आहेत. मागील काळात झालेल्या रिमझिम पावसामुळे कापूस, बाजरी मका, तूर, आधी पिके कशीबशी तग धरून आहेत. पण समाधानकारक पाऊस नसल्याने लाची वाढ खुटली आहे. नदी नाले तहानलेलेच आहेत तर विहिरी,
बोरवेलने मला आहे. परिसरात भविष्यात चारा आणि पाण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण होण्याची भीती आहे. पावसाअभावी हिरवा चारा उत्पादित करता येत नसल्याने दुधाचे उत्पादन घटत चालले आहे. विशेष म्हणजे परिसरात अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून,
अनेक गावात आता काही दिवसात टँकरने पाणीपुरवठा सुरू करावा लागणार हे निश्चित आहे. एकीकडे पिठाची चिंता असताना आता शेती कशी करायची असा प्रश्न शेतकयांना पडला आहे तर शेतमालाची आवक घटल्याने महागाई वाढण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही.
अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीत मिळालेले दर टोमॅटो. ५०० – २०००, वागी ५०० ३००० फ्ल्यावर ५०० २००० को २०० १२००, काकडी २०० – १२००, गवार ३००० – ८००० घोसाले १५००-२५०० दोडका ९०० १५००, कारले ९०० – २०००, भेंडी १०००- २५००, वाल १५०० ३०००,
घेवडा १००० – १५००० तोडुळे १५००-२०००, डिंगरी ५००० -६०००, बटाटे १०००- २०००, लसूण ८००० १६०००, हिरवी मिरची १०००- ४५०० , आवळा २०००- ३०००, शेवगा १८००-३०००, भु. ४००० ४५००, लिंबू ९०० ४०००, आक ९०००- १३,५००, गाजर १८०० -२२०० , दु.भोपळा १०० १२००, मका कणसे ५०० १४०० ८००-२५०० कोथिंबीर ४०० २०००, पालक १००० २००० शेपू भाजी १००० -२०००, मुळे १००० २०००, चवळी १५०० २०००, बीट १८००- २१००, वाटाणा २००० ४५००, कांदापात २०००-३०००.
कांदा भाव खातोय
ऑगस्ट महिन्यात कांद्याचे दर वधारत असतानाच केंद्र सरकारने निर्यातशुल्क लावण्याचा निर्णय घेतला परिणामी कांद्याचे दर काही प्रमाणात खाली आले. मात्र या आठवड्यात पुन्हा एकदा कांदा दरात हळूहळू सुधारणा होत असून चांगला पाऊस झाला नाही तरसे आणखी वाढण्याची शक्यता या श्रेत्रातील जाणकारांनी व्यक्त केली आहे.
निर्यातीवर ४० टक्के शुल्क लावण्याच्या निर्णयानंतर अनेक शेतकरी आपल्या साठवलेल्या कांद्याची सावधतेने विक्री करत आहेत. ऑगस्ट महिन्यात दा पावसाने सगळ्याच राज्यात ओढ दिली त्याचा परिणाम खरीप कांद्याच्या उत्पादनावर होणार आहे. ज्या शेतकयांचा कांदा व्यवस्थित टिकून राहिला आहे.
असा साठवणुक केलेला किमान ३० टक्के कांदा अजूनही बाजारात आलेला नाही बाजारात सध्या कांद्याची कमी प्रमाणात होत असल्याने कांद्याला चांगला भाव मिळत आहे. शनिवारी नेप्ती उपबाजार समितीत झालेल्या लिलावात ३८३ ट्रक कांद्याची आवक म्हणजेच १७६ हजार ७८७ गोवा ४२ हजार २३३ विवंटल कांदा विक्रीसाठी आला होता, यात एक नंबरच्या कांद्याला २४०० ते २००० २ नंबर १८०० ते २४००, ३ नंबर १२०० ते १८०० ४ नंबर ५०० ते १२०० रुपये असा दर मिळाला