कांदा निर्यातबंदी शेतकऱ्यांच्या मुळावर ! कांद्याच्या दरात झाली इतकी मोठी घसरण

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

केंद्र सरकारने कांदा नियांत बंदी लागू केली असून यामुळे कांदा निर्यात बंदीचा मोठा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. निर्यातबंदी करण्यापूर्वी गावरान कांदा ३९०० ते ४६५० तर लाल कांदा ३७०० ते ४४०० रूपये प्रतिक्विंटल दर मिळत होता. मात्र निर्यातबंदीमुळे कांद्याचे दर तब्बल २००० ते २५०० रुपयांनी घसरल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

निर्सगाच्या लहरीपणामुळे शेतकरी पूर्णपणे बेजार झाला होता. अवकाळी पाऊस, गारपीट तर अनेक भागामध्ये दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. अवकाळी व गारपिटीमुळे अनेक ठिकाणी काढणीस आलेल्या कांद्याचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे.

कांदा हे शेतकऱ्यांसाठी या हंगामातील दोन पैसे मिळवून देणारे त्याचबरोबर खर्चिक देखील पीक आहे. कांदा या पिकासाठी एकरी ५० ते ६० हजार रुपये खर्च येतो. त्यामुळे अशा कांद्याला केंद्र शासनाने हमीभाव देऊन शेतकऱ्यांना जगवण्याचे काम केले पाहिजे.

मात्र दुर्दैवाने तसे होत नाही. दरम्यान गेल्या काही दिवसापासून कांद्याला चांगला दर मिळत होता परंतू शेतकऱ्यांच्या हातात दोन पैसे पडत असताना केंद्र सरकारने अचानक निर्यातबंदीचा निर्णय घेतला.

हा निर्णय शेतकऱ्यांवर अन्याय करणारा असून यामुळे अनेक शेतकरी आर्थीक संकटात सापडणार आहेत. एकतर आधीच बाजार समितीत कांद्याला समाधानकारक भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या

अडचणी वाढल्या आहेत, यातच केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी लागू केली. ३१ मार्च २०२४ पर्यंत कांदा निर्यात बंदी लागू केली असून देशात कांद्याच्या दरांवर नियंत्रण राहावे या हेतूने केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली आहे.

मात्र या निर्णयानंतर बाजार समितीत कांद्याचे दर जवळपास २ हजार रुपयांनी घसरले आहेत. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. कांदा निर्यातबंदी मागे घेण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

पावसाची तूट आणि घसरलेले लागवड क्षेत्र यामुळे या महिन्याच्या सुरुवातीला कांद्याला चांगले दर मिळत असताना सरकारने घेतलेला निर्णय शेतकऱ्यांच्या मुळावरच उठला होत आहे. शनिवारी अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीत लाल कांद्याची ५९,८४५ क्विंटल आवक झाली होती तर गावरान कांद्याची १,३४८ क्विंटल आवक झाली होती.

यात १ नंबर गावरान कांद्याला १६०० ते २१५०, २ नंबर ९०० ते १६००, ३ नंबर ५०० ते ९०० तर ४ नंबर ३०० ते ५०० असा दर मिळाला, तर १ नंबर लाल कांद्याला १८५० ते २२५०, २ नंबर १०५० ते १८५०, ३ नंबर ६५० ते १०५०, तर ४ नंबर १५० ते ६५० असा दर मिळाला.