Onion Farming : कांद्याचे संतुलित व्यवस्थापन करून दर्जेदार उत्पादन घ्या!

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सध्याच्या परिस्थितीत रासायनिक खतांच्या अतिरेकी वापरामुळे भारतातील जमिनीचे आरोग्य मोठ्या प्रमाणात बिघडले असून तिचा सातत्याने ऱ्हास होत आहे. त्यामुळे पीक उत्पादन व उत्पादनाचा दर्जा घटत चाललेला आहे.

म्हणून याला काही चांगला पर्याय शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणे फार आवश्यक आहे, असे महाधन अग्रिटेक लि. पुणेचे व्यवस्थापकीय संचालक-राष्ट्रीय प्रशिक्षण प्रमुख गहिनीनाथ ढवळे यांनी म्हटले आहे.

पिकाची उत्पादनक्षमता वाढवण्याबरोबरच निसर्गाला हानी न पोहोचवणारे उपाय अमलात आणण्याची तातडीची गरज आहे. याचाच परिपाक म्हणून महाधनसारख्या लोकप्रिय खत कंपनीने यासंदर्भात जागतिक दर्जाचे क्रॉपटेक हे न्यूट्रिअंट अनलॉक टेक्नॉलॉजीवर आधारित उत्पादन भारतातील शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले आहे.

क्रॉपटेकद्वारे पिकाच्या वाढीव उत्पादनासाठी आवश्यक मात्रेच्या साह्याने संतुलित प्रमाणात मुख्य दुय्यम व सूक्ष्म या अन्नद्रव्यांच्या वापराचा समतोल साधला जाईल, म्हणून हे सर्व पाहता काळाची गरज ओळखून शेतकऱ्यांनी अशा प्रकारच्या उत्पादन वापराकडे तातडीने वळले पाहिजे, असेही ते म्हणाले.

महाधन क्रॉपटेक खताची गोणी ५० किलोंऐवजी ४० किलोंचीच आहे, कारण खत किती वापरले त्यापेक्षा खत पिकाला लागू पडले किती, हे महत्त्वाचे. ४० किलो क्रॉपटेक खत हे त्याच्या नावीन्यपूर्ण ‘न्यूट्रियंट अनलॉक टेक्नॉलॉजीमुळे’ साध्या ५० किलो खतापेक्षा जास्त पॉवरफुल आहे,

म्हणून ते जास्त कार्यक्षम आहे. क्रॉपटेक या संपूर्ण पोषण समाधानाचा कांदा पिकासाठी प्रति एकरी एकूण ८५०० रुपयांपर्यंत खर्च होतो तर याउलट शेतकरी खत वापराच्या पद्धतीनुसार हाच खर्च जवळजवळ १०००० ते ११००० रुपयांपर्यंत येतो, अशी माहिती ढवळे यांनी दिली.