कांद्याला विक्रमी ५ हजार मिळाला भाव ! कांदा मार्केट बंद राहणार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Onion News : नेवासे तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजारात दिवाळीच्या सुटीपूर्वी अखेरच्या दिवशी कांद्याला विक्रमी ५ हजार रुपयांचा बाजारभाव मिळाला.

बुधवारी दिवसभरात १२९ वाहनांमधून २३ हजार ५८८ कांदा गोण्या विक्रीसाठी बाजारात दाखल झाल्या. एकूण कांद्याचे वजन १२ लाख ९७ हजार ३४० किलो भरले.

यापैकी नवीन उन्हाळ गावरान कांद्याच्या एक दोन लॉटला ४७०० ते ५ हजार रुपयांचा भाव मिळाला. पत्तीवाला कलर मोठ्या कांद्याला ४३०० रुपये ते ४५०० रुपये,

बिस्किट कलर मोठ्या कांद्याला ३६०० ते ३७०० रुपये, मुक्कल भारी कांद्याला ३७०० ते ३८०० रुपये, बिस्कीट कलर मुक्कल कांद्याला ३२०० ते ३४०० रुपये,

बिस्किट कलर गोल्टी कांद्याला २६०० ते २९०० रुपये, जोड कांद्याला १ हजार ते दीड हजार रुपये, हलका डॅमेज कांद्याला ५०० ते ८०० रुपये बाजारभाव मिळाला. आता भाऊबीजेपर्यंत (१५ नोव्हेंबर) कांदा मार्केट बंद राहणार आहे.