बाजारभाव

अहमदनगर बाजारभाव : कांद्याच्या दरात सुधारणा ! मान्सूनचे आगमन लांबल्याने भाजीपाल्याची आवक घटली…

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar market price : अहमदनगर एकीकडे जून महावात आला तरी देखील मान्सूनचे आगमन झालेले नाही त्यामुळे पेरण्या खोळंबल्या आहेत. तर दुसरीकडे गंगा मान्सून लवकरच येईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. प्रत्यक्षात मात्र पावसाने हजेरी लावलेली नाही.

जून महिना संपत आला असून, अद्याप देखील पावसाचे चिन्ह नसल्याने शेतकरी चितेत सापडला आहे. जून महिन्यात सरासरी पाऊस होत असतो. पावसाचे आगमन लांबल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण पसरले आहे. ग्रामीण भागात शेतकन्यांनी पेरणीपूर्व मशागतीची कामे आटोपली असली ती पावमाने इत्यकावणी दिली आहे.

मान्सूनचे आगमन होण्यास उर झाला किंवा पुरेसा पाऊस झाला नाही, तर त्याच गंभीर परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर होताना दिसतात. सध्या लांबलेला मान्सून महागाईच्या दृष्टिकोनातून परिस्थिती चिंताजनक बनू शकते. देशभरात नैऋत्य मान्सूनचे आगमन लांबल्याने खरीप पिकांच्या पेरण्या लांबल्या आहेत.

नुकत्याच जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार मे महिन्यात किरकोळ महागाईबरोबरच पाऊक महागाईतही घट झाली आहे. मात्र पाऊस लांबल्याने आता शेतमालाची आवक कमी झाली आहे. त्यामुळे भाजीपाला कडाडला आहे तर दुसरीकडे पेरणी करण्यासाठी आकाशाकडे होने लावन बगलेला बळीराजा मात्र वरुणराजाचे लवकर आगमन होण्याची वाट पहात आहे.

कांद्याच्या दरात किरकोळ सुधारणा

मागील काही दिवसांपासून कांद्याच्या घसरलेल्या दराने शेतकऱ्यांचा चांगलाच वधा केला आहे. कांद्याच्या लागवडीपासून ते काढणीपर्यंत शेतकऱ्यांनी खूप खर्च केल. मात्र एकीकडे कोसळते बाजारात तर दुसरीकडे ऐन कांदा काढणीवेळी अवकाळी पावसाने झोडपल्याने मोठ्या प्रमाणावर कांदा खराब झाला.

त्यात अनेकांनी मोठा खर्च करून चाळीत कांदा साठवला मात्र चाळीत असेलला कांदेखील खराब होत असल्याने शेतकरी कांदा विक्रीसाठी आत आहेत. मात्र शेतकऱ्यांच्या कांद्याला कवडीमोल दर मिळत असल्याने शेतकरी हतबल झाला आहे.

मात्र शनिवारी झालेल्या लिलावात १५०० पर्यन्त दर मिळाल्याने काहीसे आशादायक चित्र निर्माण झाले आहे. गुरुवारी बाजार समितीत एकूण १६२ ट्रक कांद्याची आवक झाली. यातील व नंबरच्या कांद्याला १००० ते १५००, २ नंबर ७५०० ते १०००, ३ नंबर ३५० ५००, ४ नंबर १५० ते ३५० रुपये असे दर मिळाले.

अहमदनगर मध्ये भाजीपाल्याची आवक घटली

शहरात भाजीपाल्याची आवक घटली असून भाजीपाला महागला आहे. यामुळे किरकोळ बाजारात अनेक फळभाज्या ६० ते ८० रुपये किलो या दराने विकल्या जात आहेत. गेल्या काही दिवसांपासून कृषी उत्पन्न बाजार समितीत येणारा मोठ्या प्रमाणात येणारा भाजीपाला सध्या घटता असल्यने पर्यायाने आवक घटून भाजीपाला महाम झाला आहे.

येथील बाजार समितीत नगरसह मराठवाड्यातून मोठ्या प्रमाणावर भाजीपाला विक्रीसाठी आणला जातो. परंतु सध्या अधिक प्रमाणात हा भाजीपाला मोठ्या शहरात विक्रीसाठी जात आहे. त्यातच बदलत्या हवामानाचे भाजीपाल्यावर विपरीत परिणाम लोगन उत्पादन कमी विद्यालयाने बाजारातील आवक घटली आहे. यामुळे सध्या ठोक बाजारात भाजीपाला वधारला आहे.

अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीत मिळालेले दर : टोमॅटो १५०० ३५००, वांगी १५००- ४०००, कोबी ५०० १५०० काकडी १००० ३०००, गवार ३००० ६०००, घोगाळे २०००- ३०००, दोडका २०००,०००, कारले २५०० ५०००, करी १५०० ३०००, भेंडी १००० ३५००, खाल ६०००-६०००, घेवडा ८००० – १४०००,बटाटे १२०० २०००, लसूण ११०००- १५,०००, हिरवी मिरची ४००० – ७०००, पेवडा ८००० १०,०००, बटाटे १३०० २१००,लसूण ६००० १५०००, हिरवी मिरची ३५०० ६५००, शेवगा २०००-४५००, लिंब १००० – २५००, आवक १०,००० १६०००, गाजर २०००-२५००, दु.५०० १५००, शिमला मिरची २००० ४५०० मेथी ३०००-३०००, कोथिंबीर ६००० पालक २०००-२५००, शेपू भाजी चवळी

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office