बाजारभाव

Onion Price Maharashtra : कांद्याच्या दरांतही विक्रमी वाढ होणार ! हे आहे महत्वाचे कारण

Published by
Ahmednagarlive24 Office

Onion Price Maharashtra : देशात टोमॅटोचे दर आधीच गगनाला भिडले आहेत. अशातच येत्या काही दिवसांत कांद्याच्या दरांतही विक्रमी वाढ होऊ शकते असा अंदाज वर्तविल्या जात आहे. देशात टोमॅटोच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे.

पण आता टॉमेटोपाठोपाठ आणखी कांद्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागू शकते. पावसाळ्यामुळे कांद्याच्या पुरवठ्यावरही परिणाम झाला आहे. त्यामुळे यंदा डिसेंबरपर्यंत देशात कांद्याचा पुरवठा कमी होण्याची शक्यता असल्याचे काही व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

गेल्या महिन्यात महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांत कांद्याच्या किरकोळ किमतींत लक्षणीय वाढ झाल्याचे सरकारी आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही किंमत कमी असली तरी, सरकारी आकडेवारीनुसार, २०२० मध्ये भारतातील कांद्याची सरासरी किरकोळ किंमत ३५.८८ रुपये होती, २०२१ मध्ये हीच किंमत काहीशी घसरली आणि सरासरी किरकोळ किंमत ३२.५२ रुपये झाली.

तर २०२२ मध्ये ही किंमत २८ रुपये प्रति किलो होती. तसेच, यंदाच्या वर्षात म्हणजेच, २०२३ मध्ये कांद्याचे भाव स्थिर राहिले आहेत. मात्र, येत्या काही महिन्यांत कांदा सर्वसामान्यांच्या डोळ्यांत पाणी आणू शकतो. सरकारने सुमारे दोन महिन्यांपूर्वी शेतकऱ्यांकडून सुमारे ०.१४ दशलक्ष टन कांद्याचा साठा खरेदी केला आहे.

केंद्र सरकार २०२३-२४ हंगामासाठी ३ लाख टन कांदे बफर स्टॉकमध्ये ठेवणार असल्याचं केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी एप्रिलमध्ये सांगितलं होतं. तसेच, गेल्या हंगामात २०२२-२३ मध्ये २.५१ लाख टन कांदा बफर स्टॉकमध्ये ठेवण्यात आला होता.

दुसरीकडे, २०२१-२२ मध्ये कांद्याचं उत्पादन ३१.६९ दशलक्ष टनांवरून ३१.०१ दशलक्ष टनांपर्यंत घसरण्याचा अंदाज असल्याचा अहवाल भारत सरकारनंच जून महिन्याच्या सुरुवातीलाच दिला होता.

Ahmednagarlive24 Office