बाजारभाव

सोयाबीन, कांदा, डाळिंबाला मिळाले असे भाव ! जाणून घ्या सविस्तर

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2021 :- राहाता बाजार समितीत काल लाल आणि उन्हाळी या दोन्ही कांद्याच्या ३६२४ गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल उन्हाळी कांद्याला जास्तीत जास्त २६५० तर लाल कांद्याला २६०० रुपये इतका भाव मिळाला तर सोयाबीनला जास्तीत जास्त ६६३६ रुपये इतका भाव मिळाला.

राहाता बाजार समितीत ३ हजार ६२४ कांद्याच्या गोण्यांची आवक झाली. उन्हाळी कांदा नंबर १ ला २३५० ते २६५० रुपये तर लाल कांद्याला २३०० ते २६०० असा भाव मिळाला.

कांदा उन्हाळी नंबर २ ला १६०० ते २३०० रुपये, लाल कांद्याला १६५० ते २२५० रुपये भाव मिळाला. कांदा नंबर ३ ला उन्हाळी ७५० ते १५५० रुपये तर लाल कांद्याला ८०० ते १६०० भाव मिळाला,

गोल्टी उन्हाळी कांद्याला १७०० ते १९०० रुपये व लाल कांद्याला १८०० ते २००० रुपये भाव मिळाला. जोड कांद्याला उन्हाळी २०० ते ७०० रुपये व लाल कांद्याला १०० ते ७५० रुपये भाव मिळाला.

डाळिंबाच्या ३५० क्रेट्सची आवक झाली. डाळिंब नंबर १ ला ९१ ते ११० रुपये असा भाव मिळाला. डाळिंब नंबर २ ला ६१ ते ९० रुपये असा भाव मिळाला. डाळिंब नंबर ३ ला ३१ ते ६० रुपये भाव मिळाला.

डाळिंब नंबर ४ ला १० ते ३० रुपये भाव मिळाला. सोयाबीनची २५ क्विंटल आवक झाली. सोयाबीनला कमीत कमी ६४०० ते जास्तीत जास्त ६६३६ रुपये भाव मिळाला. सरासरी ६५२५ असा भाव क्विंटलला मिळाला. मकाला १५२५ रुपये प्रतिक्विंटलला मिळाले.

Ahmednagarlive24 Office