Ahmednagar Bajarbhav : पावसाने ओढ दिल्याने भाजीपाल्यांचे दर वाढले

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar Bajarbhav : आज येईल उद्या येईल म्हणून पावसाकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागलेले आहे. मात्र, मान्सूनने ओढ दिली आहे. त्यामुळे अनेक भागातील पेरण्या खोळंबल्या आहेत. काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली होती. तिथे पेरण्या झाल्या.

त्यानंतर पाऊस गायब झाल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आलेले आहे. एकूणच पावसाने ओढ दिल्याने भाजीपाल्यांचे दर वाढले आहेत. त्यात लाल मिरची देखील वधारली आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांच्या तोंडचे पाणीच पळाले आहे.

महागाईने डोकं वर काढल्याने दैनंदिन गरजा भागवताना सर्वसामान्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. मान्सून लांबल्यामुळे भाजीपाल्याचे दर वाढले आहेत. राज्यातील काही भागात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पाऊस सुरू आहे.

तर दुसरीकडे काही भागात पावसाअभावी पेरण्याच खोळंबलेल्या आहेत. त्यात पावसाळ्याच्या सुरूवातीला अवकाळी पावसाचा फटका देखील शेतमालाला बसल्याने शेतमालाच्या उत्पादनावर परिमाण झाला. यामुळे बाजारात भाज्यांची आवक ही कमी झाली आहे.

परिणामी भाज्यांचे दर हे वाढले आहेत. अनेक भाज्या या १०० ते १२० रुपये किलो झाल्या आहेत. टोमॅटोचे दर तर पेट्रोल पेक्षाही जास्त झाल्याने स्वयंपाक घरातून टोमॅटो गायब झाला आहे. लहरी हवामानाचा शेतकरी सामना करत असताना शेती करणे खूपच जिकरीचे झाले आहे.

भाजीपाला : अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीत मिळालेले दर (सर्व दर क्विंटलमध्ये) टोमॅटो ३००० – ८०००, वांगी १०००- ३५००, फ्लावर १५०० – ५०००, कोबी ५०० १५००, काकडी ५०० – २०००, गवार ३५००-७०००,

घोसाळे १०००- २५००, दोडका १५०० – ४५००, कारले १५०० – ४५००, कैरी ४००० – ४५००, भेंडी १२००-३५००, वाल २५०० – ५५००, घेवडा ३००० ५५००, बटाटे १०००-१६००, लसूण ८०००- १६,५००,

हिरवी मिरची ३००० – ८०००, शेवगा २०००- ७०००, भू. शेंग २५००-५०००, लिंबू ५०० १५००, आद्रक १००० – १४०००, गाजर १८००-२५००, दु. भोपळा ५०० – १५००, शिमला मिरची २५०० ६५००, मेथी ६०० -२४००, कोथिंबीर १०००- ३२००, पालक १००० – २५००, शेपू भाजी २०००-३०००, चुका २०००- २०००, चवळी २०००-४०००.

कडधान्य: अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीत मिळालेले दर (सर्व दर क्विंटलमध्ये) : ज्वारी गावरान २६०० ४०००, बाजरी १९०० – २३५०, काबुली चना ५१००, तूर ५१००- ८५००, हरभरा ४२५० ४७५०, मूग ४९००- ७५००, उडिद ४००० – ५५००, जवस ४१००, गहू २०००-२४००, लाल मिरची १७०००, एरंडी ५२०० – ५३००, सोयाबीन ४६०० ४७००, सूर्यफुल ३३००.