Share Market Update : ‘या’ सरकारी कंपनीला मोठे कंत्राट मिळताच शेअर्सने घेतली उसळी, तब्बल ३५ रुपयांनी वाढ

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Share Market Update : Rail Vikas Nigam Limited (RVNL) च्या शेअर्समध्ये सुरुवातीच्या व्यापारात ५ टक्क्यांहून अधिक वाढ (Increase) झाली होती. मात्र कंपनीचे शेअर्स इंट्राडेमध्ये (Intraday) NSE वर ४.०८% वाढून ३५.७५ रुपये झाले आहे.

MCL ने RVNL ला रेल्वे पायाभूत सुविधांच्या कामांसाठी प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी (Project Management Consultancy) कंत्राट दिल्याच्या वृत्तानंतर RVNL शेअर्समध्ये वाढ झाली आहे. यासाठी रेल विकास निगम लि. कोल इंडियाची उपकंपनी असलेल्या महानदी कोलफिल्ड्स (MCL) यांच्यात सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे.

रेल्वे विकास निगमचे शेअर्स

रेल्वे विकास निगमचा शेअर बीएसईवर 5.09 टक्क्यांनी वाढून 36.10 रुपयांवर पोहोचला होता, जो आधीच्या 34.35 रुपयांच्या बंद होता. तत्पूर्वी, शेअर 3.2 टक्क्यांच्या वाढीसह 35.45 रुपयांवर उघडला. रेल विकास निगमचा स्टॉक ५ -दिवस, २०-दिवस, ५०-दिवस, १००-दिवस आणि २००-दिवसांच्या चलन सरासरीच्या वर व्यापार करत आहे. बीएसईवर फर्मचे मार्केट कॅप 7,433.10 कोटी रुपये झाले.

५२ -आठवड्यांची उच्च किंमत रु. ४४.७५

एका वर्षात स्टॉक 33.08 टक्क्यांनी वाढला आहे, आणि या वर्षाच्या सुरुवातीपासून 2.45 टक्क्यांनी वाढला आहे. मिड कॅप स्टॉकने 25 ऑक्टोबर 2021 रोजी 44.75 रुपयांचा 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला होता आणि 19 एप्रिल 2021 रोजी 26.35 रुपयांच्या 52 आठवड्यांचा नीचांक गाठला होता.

RVNL ने 31 डिसेंबर 2021 रोजी संपलेल्या तिसऱ्या तिमाहीत 293.01 कोटी रुपयांच्या निव्वळ नफ्यात 4.27 टक्‍क्‍यांनी वाढ नोंदवली आहे, जे एका वर्षापूर्वीच्या याच तिमाहीत रु. 281.02 कोटी होते.