बाजारभाव

आजचे 6 वाजेपर्यंतचे सोयाबीन बाजारभाव @17-12-2021

Published by
Ahmednagarlive24 Office

आज दिनांक 17-12-2021 रोजीचे राज्यातील विविध बाजारसमितीतील सोयाबीन बाजारभाव पुढीलप्रमाणे आहेत. 

गेल्या दोन महिन्यांपासून सोयाबीनच्या दरात वाढ होणार हा शेतकऱ्यांना विश्वास होता. पण आता बाजारातील चित्र पाहून शेतकरी हे हवालदिल झाले आहेत.

कारण सर्वकाही पोषक असताना जर सोयाबीनचे दर वाढत नसतील तर उद्या उन्हाळी सोयाबीन बाजारात दाखल झाल्यावर साठवलेल्या सोयाबीनचे काय हा प्रश्न आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांचा भर विक्रीवर आहे. पण शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने विक्री केली तर फायदा होणार असल्याचे कृषितज्ञ रामेश्वर चांडक यांनी सांगितले आहे.

15 दिवसांपूर्वी सोयाबीनचे दर हे 6 हजार 600 वर गेले होते. दरम्यान, सोयापेंड आयातीची चर्चा ही सुरुच होती. त्यामुळे सोयापेंड आयातीला ‘ब्रेक’ लागल्यानंतर आता पुन्हा दरात वाढ होईल अशी अपेक्षा होती पण झाले उलटेच.

सोयाबीनचे दर हे घटत आहेत तर आवक वाढत आहे. लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी 14 हजार पोत्यांची आवक झाली होती तर सरासरी दर हा 6 हजार 100 रुपये होता.

आता शेतकरी सोयाबीन विक्रीसाठी तयार आहे मात्र, बाजारात उठावच नाही. त्यामुळे आता काय निर्णय घ्यावी याची चिंता शेतकऱ्यांना आहे.

अनेक शेतकऱ्यांनी अधिकच्या दराच्या अपेक्षेने सोयाबीनची साठवणूक केलेली आहे. पण आता दर हे घटत तरी आहेत अन्यथी स्थिर राहत आहेत.

Soyabean Rates Today Maharashtra (Updated on 2.29 PM)

दिनांक जिल्हा जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत कमी दर सर्वसाधारण दर
17/12/2021 अहमदनगर क्विंटल 423 5233 6343 5786
17/12/2021 अहमदनगर लोकल क्विंटल 416 4500 6410 6310
17/12/2021 अहमदनगर पिवळा क्विंटल 13 6000 6250 6250
17/12/2021 अकोला पिवळा क्विंटल 2400 5450 6700 6000
17/12/2021 अमरावती पिवळा क्विंटल 640 5000 6750 6000
17/12/2021 औरंगाबाद क्विंटल 39 3000 6162 4591
17/12/2021 औरंगाबाद पिवळा क्विंटल 14 5671 6240 5995
17/12/2021 बीड क्विंटल 826 5351 6378 6054
17/12/2021 बीड पिवळा क्विंटल 369 5679 6277 6061
17/12/2021 बुलढाणा नं. १ क्विंटल 45 6000 7005 6700
17/12/2021 बुलढाणा लोकल क्विंटल 400 5500 6300 6100
17/12/2021 बुलढाणा पिवळा क्विंटल 754 5700 6640 6263
17/12/2021 धुळे हायब्रीड क्विंटल 6 3100 5810 4705
17/12/2021 हिंगोली लोकल क्विंटल 390 5850 6350 6100
17/12/2021 हिंगोली पिवळा क्विंटल 175 6000 6200 6100
17/12/2021 जळगाव लोकल क्विंटल 150 5000 6071 6071
17/12/2021 जळगाव पिवळा क्विंटल 41 4900 6400 6245
17/12/2021 जालना पिवळा क्विंटल 1863 5250 6326 6100
17/12/2021 लातूर पिवळा क्विंटल 8127 6070 6511 6284
17/12/2021 नागपूर पिवळा क्विंटल 52 4775 5990 5250
17/12/2021 नांदेड पिवळा क्विंटल 180 5425 6367 5946
17/12/2021 नंदुरबार पिवळा क्विंटल 10 6490 6551 6500
17/12/2021 नाशिक पांढरा क्विंटल 308 4500 6477 6440
17/12/2021 उस्मानाबाद पिवळा क्विंटल 190 5950 6321 6148
17/12/2021 परभणी पिवळा क्विंटल 341 6033 6326 6263
17/12/2021 सांगली लोकल क्विंटल 500 6000 6800 6400
17/12/2021 वर्धा पिवळा क्विंटल 3611 5726 6290 6063
17/12/2021 वाशिम क्विंटल 2500 5875 6475 6150
17/12/2021 वाशिम पिवळा क्विंटल 4500 5500 6300 6000
17/12/2021 यवतमाळ पिवळा क्विंटल 1260 5550 5915 5793
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील) 30543
Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office