बाजारभाव

Soybean And Cotton Price: दसऱ्या अगोदर शेतकऱ्यांना आनंदाची बातमी! सोयाबीन आणि कापसाच्या दरामध्ये झाली वाढ

Published by
Ajay Patil

Soybean And Cotton Price:- कापूस आणि सोयाबीन ही खरीप हंगामातील प्रमुख पिके असून बहुतांश शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील आर्थिक गणित या दोन्ही पिकांवर अवलंबून असते. मागच्या हंगामामध्ये बाजारभावाच्या बाबतीत पाहिले तर सोयाबीन आणि कापूस या दोन्ही पिकांनी शेतकऱ्यांची निराशा केलेली होती.

परंतु यावर्षी तरी सोयाबीन आणि कापूस शेतकऱ्यांना तारेल अशी सर्वसाधारण अपेक्षा शेतकऱ्यांची आहे. त्यातल्या त्यात या हंगामामध्ये पाऊस खूप कमी प्रमाणात झाल्यामुळे कापूस आणि सोयाबीन या दोन्ही पिकांच्या उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे. उत्पादन कमी असल्यामुळे शेतकऱ्यांना या दोन्ही पिकांच्या बाबतीत चांगला बाजार भाव मिळणे खूप गरजेचे आहे.

या हंगामा मधील नवीन सोयाबीन आणि कापूस बाजारपेठेत येऊ लागले असून येणाऱ्या काही दिवसांमध्ये आवक वाढण्याची शक्यता आहे. मागच्या वर्षी कापसाच्या बाबतीत विचार केला तर शेतकऱ्यांनी भाववाढीच्या अपेक्षेने कापूस घरात साठवून ठेवला होता परंतु हंगाम संपला तरी कापूस आठ हजार रुपये प्रति क्विंटल च्या पुढे गेला नाही.

यावर्षी लागवड क्षेत्रात जरी वाढ झालेली राहिली तरी देखील पाऊस कमी झाल्यामुळे उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे. उत्पादन कमी राहील परंतु जर बाजार भाव चांगला मिळाला तर शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च निघून त्यांच्या हातात पैसा राहील अशा पद्धतीने बाजारभाव राहणे अपेक्षित आहे.या अनुषंगाने दसरा आणि दिवाळी या सणांच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा मिळेल अशी एक अपडेट समोर आली आहे.

 सोयाबीन आणि कापसाच्या दरात वाढ

याबाबत सविस्तर वृत्त असे की, कापूस आणि सोयाबीन या दोन्ही महत्त्वाच्या पिकांच्या संदर्भात एक महत्त्वाचे अपडेट समोर आले असून विदर्भातील अनेक बाजार समित्यांमध्ये सोयाबीनच्या दरात प्रतिक्विंटल दोनशे रुपयांची वाढ झालेली असून कापसाच्या दरात एक हजार रुपयांची वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे.

विदर्भामधील जर आपण अमरावती तसेच बाळापूर व मुर्तीजापूर, अकोला, भंडारा आणि वर्धा या बाजार समितीमध्ये सोयाबीनच्या दरात प्रतिक्विंटल दोनशे ते तीनशे रुपयांची वाढ झालेली असून  यामुळे नक्कीच सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना थोडाफार का होईना दिलासा मिळताना दिसून येत आहे. तसेच कापसाच्या बाजार भावात देखील प्रतिक्विंटल 1000 रुपयांची वाढ झालेली बघायला मिळाली.

सोयाबीनच्या बाबतीत येणाऱ्या काही दिवसात देखील भाव वाढ होईल असा अंदाज जाणकारांकडून व्यक्त करण्यात आला आहे. छत्रपती संभाजी नगर, जालना तसेच बीड व लातूर जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये देखील कापसाच्या दरात वाढ झाली असून विदर्भ व मराठवाडा तसेच उत्तर महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी कापूस साडेसहा हजार ते सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी केला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून येत आहे.

Ajay Patil