Soybean Bajar Bhav : सोयाबीन (Soybean Rate) हे महाराष्ट्रात उत्पादित केले जाणार हे एक प्रमुख नगदी पीक (Cash Crop) आहे. या तेलबिया पिकाची शेती महाराष्ट्रात जवळपास सर्वत्र केली जाते. महाराष्ट्र व्यतिरिक्त सोयाबीनचे उत्पादन (Soybean Production) मध्य प्रदेश राज्यात देखील मोठ्या प्रमाणात घेतले जाते. सोयाबीन उत्पादनात मध्यप्रदेश प्रथम क्रमांकावर विराजमान आहे तर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर.
मात्र गेल्या काही महिन्यापासून सोयाबीनच्या दरात (Soybean Market Price) सातत्याने घसरण पाहायला मिळत आहे. सध्या सोयाबीनला साडेचार हजार रुपये प्रति क्विंटलच्या आसपास बाजार भाव (Soybean Price) मिळत आहे. सध्या मिळत असलेला बाजार भावात सोयाबीन पिकासाठी (Soybean Crop) आलेला उत्पादन खर्च काढण्यासाठी पुरेसा नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. खरं पाहता गेल्या वर्षी सोयाबीनला चांगला उच्चांकी बाजारभाव मिळाला होता.
यामुळे या वर्षी सोयाबीन लागवडीखालील क्षेत्रात वाढ झाली आहे. गेल्या वर्षी मुहूर्ताच्या सोयाबीनला दहा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत चा बाजार भाव मिळत होता. मात्र तद्नंतर शासनाच्या काही चुकीच्या धोरणामुळे सोयाबीनच्या बाजार भावात मोठी घसरण झाली. गेल्या हंगामभर सोयाबीनला सहा हजार रुपये प्रति क्विंटलच्या आसपास बाजार भाव राहिला. मात्र त्यानंतर सोयाबीनचा बाजार भावात घसरण झाली.
सोयाबीनला मात्र साडेचार हजार रुपये प्रति क्विंटलच्या आसपास बाजारभाव मिळत आहे. अशा परिस्थितीत सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना दिलासा मिळावा सोयाबीनच्या बाजारभावात वाढ व्हावी या संदर्भात दिल्लीमध्ये बैठकांचे सत्र रंगणार आहे. पाशा पटेल यांच्या नेतृत्वाखाली मध्यप्रदेश राज्याचे कृषिमंत्री आणि सोपा प्रतिनिधीचा एक समूह केंद्रीय वाणिज्य व व्यापारी मंत्री पियुष गोयल यांची भेट घेणार आहेत. सोमवारी दिल्लीमध्ये ही महत्वपूर्ण बैठक रंगणार असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांचे तसेच जाणकार लोकांचे या बैठकीकडे लक्ष लागून आहे.
मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की देशातील गरीब जनतेला स्वस्तात खाद्यतेल उपलब्ध व्हावे या अनुषंगाने केंद्र शासनाने खाद्यतेल आयातीसाठी शुल्क मुक्त धोरण अंगीकारले आहे. यामुळे गरिबांना निश्चितच स्वस्तात खाद्यतेल उपलब्ध होतं मात्र शासनाच्या या एकतर्फी धोरणामुळे देशातील सोयाबीन उत्पादक किंवा इतर तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. गेल्या वर्षी दहा हजार रुपये प्रतिक्विंटल असलेले सोयाबीनचे बाजार भाव याच कारणामुळे पाच हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत येऊन ठेपले आहे.
आता ही बाब लक्षात घेऊन सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना दिलासा मिळावा आणि सोयाबीनच्या बाजार भावात वाढ व्हावी या अनुषंगाने शासनाच्या धोरणात आमूलाग्र बदल व्हावा या अनुषंगाने मध्यप्रदेशचे कृषिमंत्री कमल पटेल, शेतीमाल विपणन विषयाचे अभ्यासक पाशा पटेल, तसेच सोपा चे प्रतिनिधी मंडळ दिल्लीमध्ये केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची घेणार आहेत. एका आकडेवारीनुसार आपल्या देशात वीस हजार टन खाद्य तेल हे विनाशुल्क आयात केल जात.
अशा परिस्थितीत हे विनाशुल्क आयात केल्या जाणाऱ्या खाद्य तेलाला शुल्क आकारला गेला तसेच भारतातील शेतकऱ्यांना तेलबिया लागवडीसाठी प्रोत्साहन दिले गेले तर तेलबिया पिकांच्या बाजारभावात वाढ होणे शक्य आहे. असं झालं तर सोयाबीनला किमान सहा हजार ते साडेसहा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंतचा बाजार भाव मिळणे अपेक्षित आहे. जाणकार लोकांच्या मते आजतागायात शुल्क माफी च्या माध्यमातून इंडोनेशिया आणि मलेशियाच्या शेतकऱ्यांना 70 हजार कोटी रुपयांचा फायदा झाला आहे.
हाच निधी जर भारतातील शेतकऱ्यांसाठी उपयोगात आणला गेला असता तर शेतकऱ्यांचे 2022 पर्यंत उत्पन्न निश्चितच दुप्पट झाले असते. यामुळे केंद्र शासनाने गरिबांना स्वस्तात तेल दिले जावे यासाठी निश्चितच कल्याणकारी धोरण अवलंबिले पाहिजे मात्र त्यासोबतच सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना देखील चांगला दर कसा मिळेल यासाठी देखील ठोस धोरणाची अंमलबजावणी केली पाहिजे यासंदर्भात सोमवारी ही बैठक आयोजित केली जाणार आहे.
बैठकीत उपस्थित केल्या जाणार्या प्रमुख मागण्या