बाजारभाव

Soybean Bajarbhav : सोयाबीन बाजारभावात मोठा बदल ! ‘या’ ठिकाणी सोयाबीन साडे सहा हजारावर ; वाचा आजचे बाजारभाव

Published by
Ajay Patil

Soybean Bajarbhav : सोयाबीन हे एक नगदी पीक आहे. याची खरीप हंगामात बहुतांशी शेतकरी बांधव लागवड करत असतात. महाराष्ट्रात देखील सोयाबीन लागवडीखालील क्षेत्र विशेष उल्लेखनीय आहे.

देशाच्या एकूण सोयाबीन उत्पादनात महाराष्ट्राचा मोठा सिंहाचा वाटा आहे. सहाजिकच राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे सर्व अर्थकारण सोयाबीन या नगदी पिकावर अवलंबून आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांचे कायमच सोयाबीन बाजारभावाकडे बारीक लक्ष लागून असते.

आपण देखील आपल्या शेतकरी वाचक मित्रांसाठी रोजच सोयाबीन बाजारभावाची माहिती घेऊन हजर होत असतो. आज देखील आपण राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला मिळालेल्या बाजारभावाची चर्चा करणार आहोत.

राहुरी वांबोरी कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 42 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 5000 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 5600 प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 5400 प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.

अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती :- अमरावती एपीएमसी मध्ये आज 11577 क्विंटल लोकल सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 5,100 रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 5475 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव ५२८७ रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.

नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 2837 क्विंटल लोकल सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावा ते एपीएमसीमध्ये सोयाबीनला चार चार पाचशे रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 5650 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. सर्वसाधारण बाजार भाव 5,362 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.

हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समिती :- हिंगोली एपीएमसी मध्ये आज 1660 क्विंटल लोकल सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 5385 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार आठशे रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव ५५९२ रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.

लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- सोयाबीन लिलावासाठी संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या लातूर एपीएमसी मध्ये आज 13319 क्विंटल पिवळ्या सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 5301 रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 6351 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 5750 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.

अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती :– अकोला एपीएमसीमध्ये आज 5507 क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला साडेतीन हजार रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 5925 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजारभाव ५४०० रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.

यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समिती :- यवतमाळ एपीएमसी मध्ये आज 1358 क्विंटल पिवळा सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 5000 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 5900 प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजारभाव 5450 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.

मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- मलकापूर एपीएमसी मध्ये आज सोयाबीनची 1402 क्विंटल आवक झाली. आज झालेल्या लिलावात एपीएमसीमध्ये सोयाबीनला 4250 रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 5705 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 5250 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.

Ajay Patil