बाजारभाव

अखेर सोयाबीन उत्पादकांना मिळाला दिलासा…! केंद्राच्या ‘या’ निर्णयामुळे सोयाबीन दरात मोठी वाढ ; ‘या’ महिन्यापर्यंत सोयाबीन 8 हजारावर जाणार

Published by
Ajay Patil

Soybean Bajarbhav : सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना थोडासा दिलासा मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून सोयाबीनच्या बाजार भावात वाढ पाहायला मिळत आहे. दरम्यान यावर्षी अतिवृष्टीमुळे सोयाबीनचा उत्पादनात घट होणार आहे. सोयाबीन उत्पादनात घट तर होणारच आहे शिवाय सोयाबीनचा दर्जा देखील जास्तीच्या पावसामुळे खराब झाला आहे.

राज्यातील बहुतांशी शेतकरी बांधवांचा सोयाबीन जास्तीच्या पावसामुळे डागी बनला आहे. डागी सोयाबीनला बाजारात खूपच कमी बाजार भाव मिळत आहे. दरम्यान यावर्षी पावसाच्या लहरीपणामुळे सोयाबीन उत्पादित करण्यासाठी शेतकरी बांधवांना अधिक उत्पादन खर्च करावा लागला आहे.

मात्र उत्पादन खर्च अधिक झाला असला तरीदेखील पावसामुळे सोयाबीनच्या उत्पादकतेमध्ये आणि उत्पादनामध्ये मोठी घट झाली आहे. शेतकरी बांधवांच्या मते सोयाबीनची एक बॅग उत्पादित करण्यासाठी त्यांना पाच हजार रुपयांचा खर्च आला आहे. शिवाय त्यानंतर मळणी आणि शेतमाल बाजारपेठेत नेण्यासाठी खर्च अधिक करावा लागत आहे.

म्हणजे सध्या मिळत असलेल्या बाजारभावात सोयाबीन विक्री करणे शेतकऱ्यांना परवडत नाही. मित्रांनो मात्र आता सोयाबीनच्या बाजारभावात वाढ झाली आहे. काल झालेल्या लिलावात सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला हंगामातील सर्वोच्च बाजार भाव मिळाला आहे. मित्रांनो काल सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला 6500 प्रतिक्विंटरपर्यंतचा बाजार भाव मिळाला आहे.

निश्चितच काल मिळालेला बाजार भाव समाधानकारक असल्याने शेतकरी बांधवांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. दरम्यान शेतकरी बांधवांना सोयाबीनच्या दरात अजूनच वाढ होण्याची आशा आहे. मित्रांनो जाणकार लोकांनी देखील सोयाबीन दरात वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की नुकत्याच काही दिवसांपूर्वी केंद्र शासनाने सोयाबीन आणि सोयातेलवर असलेली स्टॉक लिमिट काढून घेतली आहे.

स्टॉक लिमिट काढून घेतले असल्याने याचा बाजारावर सकारात्मक परिणाम पाहायला मिळत आहे. शासनाच्या या निर्णयामुळे सोयाबीन बाजारभावात वाढ होत असल्याचे जाणकारांनी नमूद केले आहे. दरम्यान काही जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या दरात वाढ झाल्यास तसेच सोयाबीनला मागणी वाढल्यास सोयाबीनचे बाजार भाव जवळपास आठ हजार रुपये प्रति क्विंटलचा टप्पा यावर्षी देखील गाठू शकतात. निश्चितच सोयाबीनच्या दरात वाढ होत असल्याने शेतकरी बांधवांना दिलासा मिळत आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil