बाजारभाव

Soybean Bajarbhav : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! ‘या’ बाजारात सोयाबीनला मिळाला 7 हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर ; वाचा आजचे सोयाबीन बाजारभाव

Published by
Ajay Patil

Soybean Bajarbhav : सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आत्ताची सर्वात मोठी बातमी हाती आली आहे. सोयाबीनच्या दरात आज मोठी वाढ नमूद करण्यात आली आहे.

आज महाराष्ट्रातील वासिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला तब्बल सात हजार रुपये प्रतिक्विंटलचा कमाल बाजार भाव मिळाला आहे. यामुळे शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळत आहे.

विशेष म्हणजे आज वाशीम एपीएमसीमध्ये सर्वाधिक सोयाबीनची आवक नमूद करण्यात आली तरी देखील या बाजारात सोयाबीन दरात मोठी वाढ झाली असल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना येत्या काही दिवसात सोयाबीन बाजारभावात अजूनच वाढ होण्याची आशा आहे.

अशा परिस्थितीत आज आपण राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झालेल्या सोयाबीन लीलाबाची थोडक्यात पण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

कारंजा कृषी उत्पन्न बाजार समिती :- कारंजा एपीएमसी मध्ये आज 14000 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 5250 रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 5750 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 5425 रुपये नमूद करण्यात आला आहे.

बीड कृषी उत्पन्न बाजार समिती :- बीड एपीएमसी मध्ये आज 438 क्विंटल पिवळ्या सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 3800 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 5800 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 5543 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला.

वाशिम कृषी उत्पन्न बाजार समिती :– या एपीएमसीमध्ये आज सर्वाधिक सोयाबीनची आवक झाली, तसेच याच एपीएमसीमध्ये आज सोयाबीनला सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे. आज वासिम एपीएमसी मध्ये सोयाबीनचे 15000 क्विंटल आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 4750 रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून सात हजार रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 6200 प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला.

भोकर कृषी उत्पन्न बाजार समिती :- भोकर एपीएमसी मध्ये आज सोयाबीनची 554 क्विंटल आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला ४७०० रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून कमाल बाजारभाव 5791 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 5246 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.

उमरखेड कृषी उत्पन्न बाजार समिती :– उमरखेड एपीएमसीमध्ये आज सोयाबीनची अडीचशे क्विंटल आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 4900 प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 5100 प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 5000 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.

तुळजापूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज तुळजापूर एपीएमसीमध्ये 265 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. या एपीएमसीमध्ये झालेल्या लिलावात सोयाबीनला साडेपाच हजार रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 5800 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 5700 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.

मंठा कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये सोयाबीनची 294 क्विंटल आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला पाच हजार शंभर रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 5725 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सरासरी बाजारभाव साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil