Soybean Bajarbhav : सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर येत आहे. खरं पाहता, यावर्षी हंगामाच्या अगदी सुरुवातीपासून सोयाबीन बाजार भाव दबावात आहेत. यामुळे शेतकरी बांधव आर्थिक कोंडीत सापडले आहेत.
शिवाय गेल्या वर्षी सोयाबीनला विक्रमी बाजारभाव मिळाला असल्याने यावर्षी सोयाबीन लागवडीखालील क्षेत्रात वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत यावर्षी राज्यातील बहुतांशी शेतकरी बांधवांची दरवाढीची आशा फोल ठरली आहे. मात्र आता सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी थोडीशी दिलासा देणारी बातमी समोर आली आहे.
सोयाबीनच्या दरात आता वाढ होत आहे. जाणकार लोकांच्या मते, केंद्र शासनाने तेलबिया आणि खाद्यतेलावर असलेले स्टॉक लिमिट काढून घेतली असल्याने सोयाबीनच्या दरात वाढ होत आहे. स्टॉक लिमिट काढली असल्याने सोयाबीनच्या दरात मोठी वाढ होणार असून येत्या काही दिवसात सोयाबीन 7000 रुपये प्रति क्विंटलच्या सरासरी बाजारभावात विक्री होणार असल्याचा अंदाज देखील काही दान करा आणि व्यक्त केला आहे. सोयाबीन सात हजारी बनणार असल्याची चर्चा शेतकऱ्यांमध्ये देखील मोठी गाजत आहे.
नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये देखील सोयाबीन दरात वाढ झाली आहे. शुक्रवारी झालेल्या लिलावात नांदेड एपीएमसीमध्ये सोयाबीनला पाच हजार सातशे रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला असून किमान बाजार भाव 5000 रुपये प्रति क्विंटल एवढा राहिला आहे. तसेच सरासरी बाजार भाव साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातही सोयाबीन बाजारभावात वाढ होत आहे. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत आहे. मित्रांनो शुक्रवारी झालेल्या लिलावात अहमदनगर जिल्ह्यातील प्रमुख एपीएमसीमध्ये सोयाबीन दरात चांगलीच वाढ झाली आहे. शुक्रवारी राहुरी वांबोरी या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला 4950 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून कमाल बाजार भाव साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 5,225 रुपये प्रति क्विंटल एवढा राहिला आहे.
याशिवाय अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीन दरात वाढ झाली आहे. संगमनेर एपीएमसीमध्ये सोयाबीनला 5200 प्रतिक्विंटल एवढा सरासरी बाजार भाव आहे. निश्चितच सोयाबीन दरात वाढ होत आहे. शिवाय येत्या काही दिवसात सोयाबीन दरात अजूनच वाढ होण्याची शक्यता तज्ञांकडून वर्तवली जात आहे. त्यामुळे साहजिकच शेतकरी बांधवांना दिलासा मिळत आहे.