Soybean Bajarbhav : यावर्षी सोयाबीन हंगामाच्या सुरुवातीपासून शेतकरी बांधव चिंतेत सापडले आहेत. सोयाबीनला हंगामाच्या सुरुवातीपासून अतिशय कवडीमोल बाजारभाव मिळत असल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधव आर्थिक कोंडीत सापडला असल्याचे चित्र आहे.
मित्रांनो खरं पाहता, गेल्या काही दिवसांपासून सोयाबीन बाजार भावात थोडी वाढ नमूद केली जात आहे. मात्र असे असले तरी अजूनही राज्यातील काही कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला हमीभावापेक्षा कमी बाजार भाव मिळत असल्याचे चित्र आहे.
मित्रांनो काल झालेल्या लिलावात अंबड वडीगोद्री उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला सरासरी चार हजार 381 रुपये एवढा बाजार भाव मिळाला आहे. मित्रांनो सोयाबीनला चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल एवढा हमीभाव लावून दिला आहे. दरम्यान शेतकरी बांधवांच्या मते सोयाबीन पीक उत्पादित करण्यासाठी यावर्षी अधिकचा खर्च करावा लागला आहे.
यावर्षी सोयाबीन बियाण्याच्या तसेच कीटकनाशकांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत अधिकचा खर्च करून शेतकरी बांधवांनी सोयाबीन पीक उत्पादित केल आहे. दरम्यान राज्यातील बहुतांश ठिकाणी सोयाबीनला साडेचार हजार रुपये प्रति क्विंटल पेक्षा कमी बाजार भाव मिळत आहेत. काही ठिकाणी सोयाबीन बाजार भाव चार हजार रुपये प्रति क्विंटल वर आहेत.
अशा परिस्थितीत सोयाबीन पिकासाठी झालेला खर्च काढायचा कसा हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांच्या पुढ्यात उभा राहिला आहे. मित्रांनो जस की आपणास ठाऊकच आहे यावर्षी अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांना मोठा फटका बसला होता. अतिवृष्टीमुळे तसेच परतीच्या पावसामुळे सोयाबीन पिकाला देखील मोठा फटका बसला आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादनात कमालीची घट होणार आहे.
शिवाय यावर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळपास दोन हजार रुपये कमी दराने सोयाबीन विक्री होत आहे. तसेच सोयाबीन उत्पादित करण्यासाठी या वर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिकचा खर्च करावा लागला आहे. वाढती महागाईचा विचार करता सोयाबीन पिक उत्पादित करण्यासाठी दिवसेंदिवस खर्च वाढत आहे.
मात्र सोयाबीनला अतिशय कवडीमोल बाजारभाव मिळत आहे. यामुळे शेती करायची कशी हा मोठा प्रश्न शेतकरी बांधव उपस्थित करत आहे. दरम्यान जाणकार लोकांनी यावर्षी सोयाबीनला सहा हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा सरासरी बाजार भाव मिळण्याची शक्यता असल्याचे स्पष्ट केले आहे.
मात्र तूर्तास सोयाबीनला मिळत असलेला बाजार भाव निश्चित शेतकरी बांधवांना परवडणारा नसल्याचे सांगितले जात आहे. जाणकार लोकांचे मते, शेतकरी बांधवांनी सहा हजार रुपये प्रति क्विंटल एवढी दर पातळी निश्चित करून सोयाबीनची टप्प्याटप्प्याने विक्री करत राहणे त्यांच्यासाठी फायद्याचे ठरणार आहे.