Soybean Bajarbhav : आज सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी थोडीशी दिलासादायक बातमी समोर येत आहे. आज राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीन दरात थोडीशी वाढ झाली आहे. आज लातूर, अकोला, एपीएमसी मध्ये सोयाबीनच्या कमाल दरात वाढ झाली आहे.
राज्यातील इतर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मात्र आजही सोयाबीन दर दबावात पाहायला मिळाले. राज्यातील बहुतांशी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीन साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटल पेक्षा कमी सरासरी दरात विक्री झाला.
दरम्यान आज आपण राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला मिळालेल्या बाजारभावाविषयी विस्तृत चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत.
राहुरी वांबोरी कृषी उत्पन्न बाजार समिती :– या एपीएमसी मध्ये आज 21 क्विंटल सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 5000 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5400 प्रतिक्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 5200 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.
कारंजा कृषी उत्पन्न बाजार समिती :- कारंजा एपीएमसी मध्ये आज साडेपाच हजार क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात एपीएमसी मध्ये सोयाबीनला 5150 रुपये प्रत्येक क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5575 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव ५३६० रुपये नमूद करण्यात आला आहे.
परळी वैजनाथ कृषी उत्पन्न बाजार समिती :– या एपीएमसी मध्ये आज 800 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 5251 रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5611 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 5451 नमूद करण्यात आला आहे.
तुळजापूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 355 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 5400 प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5550 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 5500 नमूद करण्यात आला आहे.
मालेगाव वाशिम कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 380 क्विंटल सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 5500 रुपये प्रति क्विंटल किमान दर मिळाला असून 5950 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजारभाव 5700 नमूद करण्यात आला आहे.
राहता कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या एपीएमसी मध्ये सोयाबीनची 122 क्विंटल आवक झाली. आज झालेल्या लीलाबाद या एपीएमसी मध्ये सोयाबीनला ४९०१ रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5626 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 5475 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.
अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज 8781 क्विंटल लोकल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 5200 प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5560 रुपये प्रतिक क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 5380 रुपये नमूद करण्यात आला आहे.
नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 2375 क्विंटल लोकल सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 4500 प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5532 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 5274 रुपये नमूद करण्यात आला आहे.
हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 1699 क्विंटल लोकल सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 5280 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5870 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 5575 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.
कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज 591 क्विंटल लोकल सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला साडेचार हजार रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5793 प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 5511 प्रति देऊन त्याला नमूद करण्यात आला आहे.
मेहकर कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 3900 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 5200 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5800 प्रतिक्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 5400 प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला.
लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज 12464 क्विंटल पिवळा सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 5200 प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 6,200 प्रतिक्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 5650 रुपये नमूद करण्यात आला.
जालना कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 7887 क्विंटल पिवळा सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावा द्या एपीएमसी मध्ये सोयाबीनला चार हजार रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5900 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 5500 प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.
अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती :- अकोला एपीएमसी मध्ये आज 4969 क्विंटल पिवळा सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात एपीएमसी मध्ये सोयाबीनला 4405 रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून सहा हजार रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 5500 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला.
यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 1023 क्विंटल पिवळा सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 5200 प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5625 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार पाव 5412 रुपये नमूद करण्यात आला.
हिगणघाट कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 6380 क्विंटल पिवळा सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 4650 रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5700 प्रतिक्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 5010 नमूद करण्यात आला.