Soybean Bajarbhav : सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांसाठी गेल्या काही दिवसांपासून दिलासादायक बातमी समोर येत आहे. मित्रांनो जसं की आपणास ठाऊकच आहे सोयाबीन बाजार भावात आता वाढ नमूद केली जात आहे.
यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना दिलासा मिळाला आहे. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, गेल्या वर्षी केंद्र शासनाने खाद्यतेलाच्या किमती नियंत्रित करण्यासाठी खाद्यतेल आणि तेलबियावर स्टॉक लिमिट लावून दिले होते.
परिणामी खाद्यतेलाच्या किमती नियंत्रित झाल्या मात्र याचा फटका तेलबिया पिकांच्या दराला पण बसला. तेलबिया पिकांच्या बाजारभावात मोठी घसरण झाली. सोयाबीनच्या दरात देखील यामुळे मोठी घसरण झाली होती. मित्रांनो केंद्र शासनाने खरं पाहता डिसेंबर 2022 पर्यंत ही स्टॉक लिमिट वाढवली होती.
तर आता खाद्यतेलाच्या किमती नियंत्रित झाल्या असल्याने केंद्र शासनाने स्टॉक लिमिट काढून घेतली आहे. स्टॉक लिमिट काढली असल्याने सोयाबीनच्या दरात वाढ होत असल्याचे चित्र आहे. यामुळे निश्चितच सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे. दरम्यान शासनाच्या या निर्णयाचे शेतकऱ्यांकडून कौतुक होत आहे.
जाणकार लोकांनी देखील शासनाच्या या निर्णयाचे तोंड भरून कौतुक केले आहे. दरम्यान केंद्र शासनाने स्टॉक लिमिट काढून घेतल्यानंतर सोयाबीनच्या किमती या आठवड्यात तब्बल 4.8 टक्क्यांनी वाढले आहेत.
सोयाबीनचे दर 5556 रुपये प्रति क्विंटल पर्यंत येऊन ठेपले आहेत. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, सोयाबीनची स्पॉट किंमत (इंदूर) गेल्या आठवड्यात पाच हजार 303 रुपयांवर होती.
त्यावेळी सोयाबीनच्या दरात 2.2 टक्के एवढे वाढ झाली होती. दरम्यान या आठवड्यात यामध्ये 4.8 टक्क्यांनी वाढ झाली असून सोयाबीनचे दर 5556 पर्यंत येऊन ठेपले आहेत. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की सोयाबीन साठी केंद्र शासनाने 4300 प्रतिक्विंटल एवढा हमीभाव जाहीर केला आहे.
साहजिकच सध्या स्पॉट बाजारात सोयाबीनच्या किमती हमीभावापेक्षा अधिक आहेत. एकंदरीत सोयाबीनच्या किमतींचा वाढता कल आहे. दरम्यान सोयाबीन उत्पादन शेतकरी बांधवांच्या मते सध्या मिळत असलेल्या बाजारभावात सोयाबीन पिकासाठी झालेला खर्च काढणे मुश्कील आहे.
शेतकरी बांधवांना सोयाबीनच्या दरात अजून वाढ होण्याची अपेक्षा आहे. दरम्यान जाणकार लोकांनी सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना सहा हजार रुपये प्रति क्विंटल एवढी दर पातळी लक्षात घेऊन सोयाबीनची विक्री करत रहावे असे आवाहन केले आहे.