Soybean Bajarbhav : सोयाबीनचे बाजार भाव (Soybean Market Price) हे जागतिक सोयाबीन उत्पादनावर (Soybean Production) अवलंबून असतात. अशा परिस्थितीत जागतिक सोयाबीन उत्पादन घटते किंवा वाढते यावर सोयाबीन दराची (Soybean Rate) पुढील वाटचाल अवलंबून राहणार आहे.
दरम्यान अमेरिकेच्या कृषी विभागाने (USAD) जारी केलेल्या आपल्या एका अंदाजानुसार यावर्षी प्रमुख सोयाबीन (Soybean Crop) उत्पादक देशात सोयाबीनचे उत्पादन वाढणार आहे, तसेच अमेरिका आणि भारतात सोयाबीन उत्पादन कमी होणार आहे. मात्र अमेरिकेच्या कृषी विभागाच्या या रिपोर्टवर अनेक जाणकार लोकांनी आक्षेप नोंदवला आहे.
जाणकार लोकांच्या मते गेल्या वर्षी अमेरिकेच्या कृषी विभागाने सुरुवातीला सोयाबीन उत्पादन वाढणार असल्याची भविष्यवाणी केली होती. मात्र सोयाबिनच्या उत्पादनात मागील वर्षी घट झाली. यावर्षी देखील सोयाबीन उत्पादनात घट होणार असल्याचा काही जाणकारांनी दावा केला आहे.
अमेरिकेच्या कृषी विभागाने जारी केलेल्या आपल्या रिपोर्टनुसार, यावर्षी ब्राझील, अर्जेंटिना, पेरूग्वे आणि चीन मध्ये सोयाबीन उत्पादन वाढणार आहे. तसेच भारत आणि अमेरिकेत सोयाबीन उत्पादन कमी होणार आहे. मात्र अमेरिकेचा हा अंदाज अनेक तज्ञ लोकांना मान्य नाही. कारण की ब्राझील अर्जेंटिना आणि पेरूग्वे या तिन्ही देशांत आत्ताशी सोयाबीन पेरणी सुरू झाली आहे.
अशा परिस्थितीत तेथील उत्पादनाचा आत्ता अंदाज बांधणे कठीण आहे. त्यामुळे जागतिक सोयाबीन उत्पादन कमी होते की वाढते हे तर येणारा काळच सांगेल. एकंदरीत ब्राझील अर्जेंटिना आणि पेरूग्वे या देशात पुढील हवामान कसं राहतं त्यावर सोयाबीन उत्पादन अवलंबून राहणार आहे.
मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की सध्या अमेरिका आणि भारत या दोन्ही देशातील सोयाबीन बाजारात विक्रीसाठी आल आहे. दरम्यान या दोन्ही देशाच्या सोयाबीन उत्पादनात घट होणार असल्याचा अमेरिकेचा अंदाज सार्वजनिक झाला असल्याने जागतिक बाजारात सोयाबीन बाजार भावात आता थोडीशी सुधारणा झाली आहे.
अहवाल आल्यानंतर सीबोटवर सोयाबीन वायदे उच्चांकी बाजार भावावर पोहोचले आहेत. दरम्यान देशांतर्गत सोयाबीन उत्पादनाचा विचार करता भारतातील प्रमुख सोयाबीन उत्पादक राज्य राजस्थान, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रात परतीच्या पावसामुळे सोयाबीन पिकाचे नुकसान झाले आहे. यामुळे सध्या सोयाबीन बाजार भावात सुधारणा होत आहे. सध्या देशांतर्गत नवीन सोयाबीन 4300 रुपये प्रति क्विंटल ते 4700 रुपये प्रति क्विंटल पर्यंत विक्री होत आहे.
तसेच जुना सोयाबीन पाच हजार ते पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत विक्री होत आहे. प्रक्रिया उद्योगाकडून देखील सोयाबीन पाच हजार शंभर रुपये प्रति क्विंटल ते साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत सोयाबीन खरेदी केला जात आहे. सध्या सोयाबीन बाजारभावात चढउतार पाहायला मिळत असली तरी देखील सोयाबीनला पाच हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा बाजार भाव गृहीत धरून शेतकरी बांधवांनी सोयाबीनची विक्री करावी असे आवाहन जाणकार लोकांनी केल आहे.