Soybean market : यंदाचा सोयाबीन हंगाम सुरू झाल्यापासून सोयाबीनचे बाजार भाव दबावात आहेत. जसं की आपणास ठाऊकच आहे की, सोयाबीन हे संपूर्ण भारतात घेतले जाणार एक मुख्य नगदी पीक आहे. साहजिकच सोयाबीन दर दबावत असल्यामुळे राज्यातील बहुतांशी शेतकरी बांधव चिंताग्रस्त असल्याचे चित्र आहे.
मध्यंतरी सोयाबीन 6,000 प्रतिक्विंटलपर्यंतच्या सरासरी दरात विकला जात होता. विशेष म्हणजे बराच काळ राज्यातील काही कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला साडेसहा हजार रुपये प्रति क्विंटलचा कमाल दर मिळाला होता. पण त्यानंतर सोयाबीन दरात पुन्हा घसरण झाली. सध्या स्थितीला सोयाबीनचे बाजार भाव साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटलपेक्षा खाली आले आहेत. त्यामुळे बळीराजा जरा चिंतेत आहे.
दरम्यान सोयाबीनचा प्रमुख ग्राहक अर्थातच चीनमध्ये कोरोनाची रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत याचा सोयाबीन दरावर विपरीत परिणाम होऊ शकतो अशी शक्यता तज्ञांकडून वर्तवली जात आहे. तर काही जाणकार लोकांनी असं असलं तरी सोयाबीनला साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटल ते 6000 रुपये प्रतिक्विंटल पर्यंतचा दर मिळू शकतो असं सांगितलं आहे.
आता भविष्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कसा राहतो आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनला काय दर मिळतो यावरच देशांतर्गत सोयाबीन बाजार भाव अवलंबून राहणार आहेत. दरम्यान आपण आज नेहमीप्रमाणेच सोयाबीन बाजारभावाची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया आजच्या सोयाबीन दराबद्दल थोडक्यात पण सविस्तर.
सिल्लोड कृषी उत्पन्न बाजार समिती :-
आज या मार्केटमध्ये 75 क्विंटल सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये सोयाबीनला 5300 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5450 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 5400 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.वरोरा कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 219 क्विंटल लोकल सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये सोयाबीनला 4000 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5300 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 5100 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.