Soybean Market Price : शेतकरी बांधवांसाठी थोडीशी चिंताजनक बातमी समोर येत आहे. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याची आज देखील मोठी निराशा झाली आहे. आज पण सोयाबीन बाजारभावात मोठी घसरण झाली आहे.
यामुळे दरवाढीची आशा पुन्हा एकदा फोल ठरली आहे. जाणकार लोकांनी पामतेलाच्या दरात वाढ होत असल्याने सोयाबीन दरात वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे.
मात्र तूर्तास तरी सोयाबीन दरात वाढ झालेली नाही. दरम्यान आज आपण राज्यातील प्रमुख एपीएमसीमधील सोयाबीन बाजारभावाची माहिती जाणून घेणार आहोत.
सिल्लोड कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 78 क्विंटल सोयाबीन आवक झाली. झालेल्या निलावा ते एपीएमसी मध्ये सोयाबीनला 5000 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5200 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजारभाव 5100 नमूद झाला आहे.
पैठण कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये शंभर क्विंटल पिवळा सोयाबीन आवक झाली आहे. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला चार हजार 936 रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून पाच हजार 353 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 5173 नमूद झाला आहे.
देवणी कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 18 क्विंटल पिवळा सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 5291 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून पाच हजार 508 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजारभाव 5400 नमूद झाला आहे.