Soybean Market Price : सोयाबीन (Soybean Crop) हे प्रमुख तेलबिया पीक (Oilseed Crop) असून राज्यात या तेलबिया पिकाची शेती विशेष उल्लेखनीय आहे. सोयाबीन खरीप हंगामातील (Kharif Season) एक मुख्य पीक म्हणून ओळखले जाते तसे त्याला नगदी पीक (Cash Crops) म्हणून देखील ओळखतात.
सोयाबीन या नगदी पिकाची शेती शेतकरी बांधवांना (Farmer) विशेष लाभदायक ठरत असल्याने याच्या लागवडीकडे गेल्या अनेक शतकांपासून शेतकरी बांधव आकृष्ट होत असल्याचे चित्र आहे. राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे सर्व अर्थकारण सोयाबीन या नगदी पिकावर अवलंबून असल्याने आम्ही दररोज सोयाबीनचे बाजार भाव (Soybean Rate) शेतकरी बांधवांसाठी घेऊन येत असतो.
आज 22 ऑगस्ट रोजी राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (APMC) असलेले सोयाबीनचे बाजारभाव आपण जाणुन घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया 22 ऑगस्ट 2022 रोजी राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला मिळालेले दर.
22 ऑगस्ट रोजीचे बाजारभाव
कारंजा कृषी उत्पन्न बाजार समिती:- कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज सोयाबीनची चार हजार क्विंटल आवक नमूद करण्यात आली आहे. या बाजार समितीत आज सोयाबीन ला कमीत कमी पाच हजार 725 रुपये प्रति क्विंटल एवढा बाजार भाव मिळाला असून जास्तीत जास्त बाजार भाव पाच हजार 910 रुपये प्रति क्विंटल एवढा होता तसेच सर्वसाधारण बाजार भाव 5 हजार 840 रुपये प्रति क्विंटल एवढा होता.
नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती:- नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत आज 239 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज या बाजारात सोयाबीनला कमीत कमी पाच हजार रुपये प्रति क्विंटल एवढा बाजार भाव मिळाला असून जास्तीत जास्त बाजार भाव 5 हजार 825 रुपये प्रति क्विंटल एवढा होता तसेच सर्वसाधारण बाजार भाव पाच हजार 619 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
मेहकर कृषी उत्पन्न बाजार समिती:- मेहकर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 780 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. बाजार समितीत सोयाबीनला पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल एवढा कमीत-कमी बाजार भाव मिळाला असून जास्तीत जास्त बाजारभाव 5950 एवढा होता तसेच सर्वसाधारण बाजार भाव 5700 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समिती:- मलकापूर एपीएमसीमध्ये आज 407 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज या बाजार समितीत सोयाबीनला 4800 रुपये प्रति क्विंटल एवढा कमीत कमी बाजार भाव मिळाला असून जास्तीत जास्त बाजार भाव पाच हजार 855 रुपये नमूद करण्यात आला. सर्वसाधारण बाजार भाव 5 हजार चारशे रुपये प्रति क्विंटल एवढा असल्याचे बाजार समिती प्रशासनाकडून नमूद करण्यात आले.
केज कृषी उत्पन्न बाजार समिती :- केज कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज 248 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. या बाजार समितीत 5850 रुपये प्रति क्विंटल एवढा सोयाबीनला कमीत कमी बाजार भाव मिळाला असून जास्तीत जास्त बाजार भाव सहा हजार रुपये प्रति क्विंटल एवढा होता तसेच सर्वसाधारण बाजारभाव पाच हजार 900 रुपये प्रति क्विंटल एवढा राहिला.