Soybean Market Price : भारतात सोयाबीन (Soybean Crop) हे एक नगदी पीक (Cash Crop) म्हणून ओळखले जाते. या नगदी पिकाची शेती आपल्या महाराष्ट्रात देखील विशेष उल्लेखनीय आहे. मात्र सध्या या नगदी पिकाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणल आहे.
गेल्या महिन्याभरापासून सोयाबीनच्या दरात (Soybean Rate) सतत घसरण होत असल्याने सोयाबीन उत्पादक (Soybean Grower Farmer) चिंतेत सापडला आहे. महिन्याभरापूर्वी सात हजार रुपये प्रति क्विंटलच्या घरात असणारा सोयाबीन आता तब्बल तीन हजार रुपये प्रति क्विंटलवर येऊन ठेपला आहे. यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना उत्पादन खर्च वसूल करणे देखील मोठे मुश्कील होत असल्याचे सांगितले जात आहे.
मित्रांनो आज नाशिक जिल्ह्यातील लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत येणाऱ्या विंचूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला तीन हजार रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव (Soybean Bajarbhav) मिळाला आहे. यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांची काळजाची धडधड वाढली आहे. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, गेल्या तीन-चार दिवसांपासून बाजारात नवीन सोयाबीन देखील येऊ लागला आहे.
अशा परिस्थितीत दिवसागणिक सोयाबीनच्या दरात होणारी घसरण सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांचा काळजाचा ठोका चुकवत आहे. काल चार हजार रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव सोयाबीनला मिळाला होता. मात्र आता यामध्ये देखील घसरण झाली असून तीन हजार रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव सोयाबीनला विंचूर एपीएमसीमध्ये (Apmc) नमूद करण्यात आला आहे.
यामुळे आगामी काही दिवसात जेव्हा नवीन सोयाबीनची आवक वाढेल तेव्हा सोयाबीनला बाजार भाव अपेक्षा देखील कमी होईल की काय अशी आशंका शेतकरी बांधवांच्या मनात घर करू लागली आहे. मित्रांनो आम्ही रोजच आपल्या शेतकरी वाचक मित्रांच्या सोयीसाठी सोयाबीन बाजार भावाची माहिती घेऊन हजर होत असतो. आजदेखील आपण राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला मिळालेल्या बाजारभावाविषयी चर्चा करणार आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया आजचे सोयाबीन बाजार भाव.
कारंजा कृषी उत्पन्न बाजार समिती :- कारंजा एपीएमसीमध्ये आज एकूण 800 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज कारंजा एपीएमसी मध्ये झालेल्या लिलावात सोयाबीनला पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला असून चार हजार 695 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला आहे. तसेच साध्या एपीएमसीमध्ये सोयाबीनला पाच हजार 45 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव मिळाला आहे.
तुळजापूर कृषी उत्पन्न बाजार समिती:- तुळजापूर एपीएमसीमध्ये आज 85 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. आज तुळजापूर एपीएमसीमध्ये झालेल्या लिलावात सोयाबीनला पाच हजार शंभर रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला असून 5000 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव नमूद करण्यात आला आहे. तसेच आज पाच हजार शंभर रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव या एपीएमसीमध्ये सोयाबीनला मिळाला आहे.
अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती :- सोयाबीन लिलावासाठी विशेष ओळखल्या जाणाऱ्या अमरावती एपीएमसी मध्ये 1452 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात अमरावती एपीएमसीमध्ये सोयाबीनला पाच हजार 131 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला असून चार हजार 750 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव नमूद करण्यात आला. तसेच सोयाबीनला चार हजार 940 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव आज या एपीएमसीमध्ये मिळाला आहे.
ज्वाला बाजार कृषी उत्पन्न बाजार समिती:- या बाजारात सोयाबीनची आज 130 क्विंटल आवक झाली. आज झालेल्या लिलावात याठिकाणी सोयाबीन ला 1200 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला असून चार हजार 900 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला आहे. तसेच आज या बाजार समितीत सोयाबीनला पाच हजार रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव मिळाला आहे.
ताडकळस कृषी उत्पन्न बाजार समिती :- ताडकळस एपीएमसीमध्ये आज 57 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. आज या बाजारात पाच हजार 501 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव सोयाबीन ला मिळाला असून पाच हजार शंभर रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला आहे. तसेच आज या बाजारात सोयाबीनला पाच हजार 251 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव मिळाला आहे.
हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज हिंगणघाट एपीएमसीमध्ये 1134 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला पाच हजार 195 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला असून चार हजार रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला आहे. तसेच चार हजार 490 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव आज या एपीएमसीमध्ये सोयाबीनला मिळाला आहे.
काटोल कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज 33 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. या एपीएमसीमध्ये आज सोयाबीनला 4800 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला असून तीन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव सोयाबीनला मिळाला आहे. तसेच चार हजार रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव सोयाबीन ला अजय एपीएमसी मध्ये मिळाला.
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती :- लासलगाव एपीएमसीमध्ये आज 531 क्विंटल सोयाबीनची आवक नमूद करण्यात आली. आज झालेल्या लिलावात लासलगाव एपीएमसी मध्ये सोयाबीनला पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला असून तीन हजार सहाशे एक रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला आहे. तसेच 5251 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव आज या एपीएमसीमध्ये नमूद करण्यात आला आहे.
विंचूर(लासलगाव) कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये सोयाबीनची 186 क्विंटल आवक झाली. आज झालेल्या लिलावात विंचुर एपीएमसीमध्ये सोयाबीनला 5336 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला असून तीन हजार रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजारभाव मिळाला आहे. तसेच 5200 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव आज या एपीएमसीमध्ये सोयाबीनला मिळाला आहे.