Soybean Market Price : सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी (Soybean Grower Farmer) थोडीशी दिलासादायक बातमी समोर येत आहे. मित्रांनो खरे पाहता काल शेवगाव एपीएमसीमध्ये (Apmc) झालेल्या लिलावात सोयाबीनला 4700 रुपये प्रति क्विंटल एवढा बाजार भाव (Soybean Rate) मिळाला होता.
मात्र, आज सोयाबीनच्या बाजारभावात (Soybean Bajarbhav) सुधारणा झाली आहे. आज राज्यातील अनेक प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीन पाच हजाराच्या वर बघायला मिळाला. अनेक ठिकाणी सोयाबीन साडे पाच हजाराच्या आसपास होता.
मात्र असे असले तरी सध्या मिळत असलेला बाजारभाव सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या (Farmer) अपेक्षेप्रमाणे नसल्याचे सांगितले जात आहे. मात्र असे असले तरी आज झालेल्या सोयाबीन लिलावात सोयाबीन (Soybean Crop) बाजारभावात सुधारणा झाली असल्याने आगामी काळात सोयाबीनचे दर अजून वाढतील अशी आशा शेतकर्यांना आहे. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया आजचे सोयाबीन बाजार भाव सविस्तर.
कारंजा कृषी उत्पन्न बाजार समिती : कारंजा एपीएमसीमध्ये आज 700 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात सोयाबीनला पाच हजार 280 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला असून साडेचार हजार रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला आहे. तसेच आज या बाजार समितीत सोयाबीनला पाच हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव मिळाला आहे.
अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती :- अमरावती एपीएमसीमध्ये आज 273 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. आज या एपीएमसीमध्ये झालेल्या लिलावात सोयाबीनला पाच हजार 172 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला असून चार हजार 750 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव चार हजार 961 रुपये प्रति क्विंटल एवढा होता.
नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती :– नागपुर एपीएमसीमध्ये सव्वा दोनशे क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात सोयाबीनला चार हजार 972 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला असून चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला आहे. तसेच सोयाबीनला 4829 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव आज नमूद करण्यात आला आहे.
अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती :- अकोला एपीएमसी मध्ये सोयाबीनची 540 क्विंटल आवक झाली. आज झालेल्या लिलावात अकोला एपीएमसी मध्ये सोयाबीन ला पाच हजार 170 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच आज झालेल्या लिलावात सोयाबीनचा चार हजार 700 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला आहे. तसेच आज एपीएमसीमध्ये सोयाबीनला चार हजार 955 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव नमूद करण्यात आला आहे.
हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये सोयाबीनची 342 क्विंटल आवक झाली. आज झालेल्या लिलावात सोयाबीनला 4945 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला असून 3800 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव चार हजार 270 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
बीड कृषी उत्पन्न बाजार समिती :- बीड एपीएमसीमध्ये 116 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज या एपीएमसीमध्ये सोयाबीनला पाच हजार 101 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला असून चार हजार 900 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला आहे. तसेच 5056 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव आज या एपीएमसीमध्ये सोयाबीनला मिळाला आहे.
वाशिम कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज वाशिम एपीएमसीमध्ये अठराशे क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज वाशिम एपीएमसीमध्ये झालेल्या लिलावात सोयाबीनला पाच हजार 170 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला असून चार हजार 550 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला आहे. तसेच आज वाशिम एपीएमसीमध्ये सोयाबीनला पाच हजार रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव मिळाला आहे.
मुर्तीजापुर कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये सोयाबीनची 410 क्विंटल आवक झाली. आज झालेल्या लिलावात मुर्तीजापुर एपीएमसीमध्ये सोयाबीनला पाच हजार 150 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला असून चार हजार 875 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला आहे. तसेच आज या एपीएमसीमध्ये सोयाबीनला पाच हजार पाच रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव मिळाला आहे.