बाजारभाव

Soybean Rate : शेतकऱ्यांना सुखद धक्का ! ‘या’ एका कारणामुळे सोयाबीन दरात होणार मोठी वाढ

Published by
Ajay Patil

Soybean Rate : महाराष्ट्रात सोयाबीन लागवडीखालील क्षेत्र विशेष उल्लेखनीय आहे. देशातील एकूण सोयाबीन उत्पादनात महाराष्ट्राचा मोठा सिंहाचा वाटा आहे. साहजिकच या पिकावर राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून आहे.

दरम्यान गेल्या वर्षी मला दर मिळाला असल्याने यावर्षी या पिकाच्या लागवडीखालीलं क्षेत्रात वाढ झाली आहे. शेतकऱ्यांना यंदा सोयाबीनला चांगला भाव मिळेल अशी आशा होती. मात्र या हंगामात आत्तापर्यंत शेतकऱ्यांच्या आशा फोल ठरत असल्याचे चित्र आहे. दरम्यान सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांसाठी एक सुखद धक्का देणारी बातमी समोर येत आहे.

सोयाबीनच्या बाजार भावात लवकरच वाढ होणार असल्याचा दावा बाजार अभ्यासकांकडून केला जात आहे. खरं पाहता पाम तेलाचा सर्वात मोठा उत्पादक देश अर्थातच मलेशिया त्या ठिकाणी पामतेलाच्या दरात वाढ झाली आहे. पामतेलाच्या वायदा बाजारात देखील तेजी आली आहे. गेल्या पाच महिन्याच्या उच्चांकी किमतीवर पाम तेलाचे सौदे होत आहेत.

आता तुम्ही म्हणाल पामतेलाच्या किमती वाढल्या तर त्याचा सोयाबीन बाजारभावाची काय संबंध. तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की, सोयाबीन पासून मुख्यता सोया पेंड आणि सोयाबीन तेल या दोन बाय प्रॉडक्टची निर्मिती होते आणि यांना बाजारात काय दर मिळतो त्यावर सोयाबीनला प्रत्यक्षात बाजारभाव मिळत असतो. आता पामतेलाच्या किमती वाढत असल्याने साहजिकच सोयाबीन तेलाची पण किंमत वाढणार आहे यामुळे सोयाबीन बाजारभावात वाढ होण्याची शक्यता आहे.

जाणकार लोकांनी दिलेल्या बहुमूल्य माहितीनुसार सध्या चीनमध्ये सरकारकडून कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. यामुळे याचा विपरीत परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारावर जाणवत होता. दरम्यान आता तेथील सामान्य जनतेने सरकार विरोधात आंदोलन छेडले आहे. अशा परिस्थितीत तिथे लवकरच मार्केट ओपन होणार असून मोठ्या प्रमाणात पामतेलची आयात होणार आहे. दरम्यान भारतात देखील पामतेलाची आयात मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता असून यामुळे पामतेलाचे दर व धरणार आहेत.

सहाजिकच पामतेलाचे दर वाढले म्हणजेच सोयाबीन दराला याचा आधार मिळणार आहे. दरम्यान सोयाबीन दर वाढीच अजून एक कारण समोर आलं आहे. जाणकार लोकांनी सांगितल्याप्रमाणे सध्या बाजारात सोयाबीनचे दर दबावात असल्याने शेतकरी बांधवांनी सोयाबीन विक्रीसाठी आखडता हात घेतला आहे. परिणामी बाजारात सोयाबीनची आवक कमी आहे. यामुळे प्रक्रिया उद्योगाची गोची निर्माण झाली आहे.

अशा परिस्थितीत उद्योगाकडून वाढीव दराने सोयाबीन खरेदी करण्याची तयारी आहे. निश्चितच येत्या काही दिवसात या परिस्थितीचा सोयाबीन दरावर सकारात्मक परिणाम होणार आहे. दरम्यान आज झालेल्या लिलावात सोयाबीनची खरेदी 5200 प्रतिक्विंटल ते पाच हजार 500 रुपये प्रतिक्विंटलच्या सरासरी बाजारभावाने झाली आहे.

प्रक्रिया उद्योगाकडून मात्र 5400 ते 5800 रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा दर मिळाला आहे. आगामी काळात यामध्ये बदल होऊन सोयाबीन दरात वाढ होण्याची शक्यता जाणकार लोकांकडून वर्तवण्यात आली आहे.

Ajay Patil