Sugar Prices Hike : अल निनोमुळे साखर खाणार भाव ! पहा काय झाला बाजारभावावर परिणाम

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Sugar Prices Hike : अल निनो, युक्रेनमधील युद्ध, चलन कमकुवकता आणि नैसर्गिकरीत्या उद्भवणाऱ्या हवामानातील घटना यामुळे अन्न असुरक्षितता वाढली आहे. विकसनशील देशांतील लोकांना साखरेच्या गगनाला भिडलेल्या किमतींमुळे बिकट परिस्थितीचा सामना करावा लागत आहे.

गेल्या दोन महिन्यांत आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर ५५ टक्क्यांनी वाढले आहेत. जागतिक साखरेच्या किमती २०११ नंतरच्या सर्वोच्च पातळीवर आहेत. जगातील दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाचे निर्यातदार भारत आणि थायलंडमध्ये असामान्यपणे कोरड्या हवामानामुळे उसाच्या पिकाचे नुकसान झाल्यामुळे जागतिक साखर पुरवठा कमी झाला आहे.

विकसनशील देश आधीच भातासारख्या मुख्य अन्नाच्या कमतरतेशी झगडत आहेत. विकसनशील देशांसाठी हा नवा धक्का आहे. त्यामुळे अन्नधान्याची महागाई वाढली आहे. परिणामी २०२३-२४ हंगामात जागतिक साखर उत्पादनात दोन टक्क्यांनी घट होण्याची शक्यता संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेने (एफएओ) वर्तवली आहे.

या परिस्थितीनुसार, जागतिक साखर उत्पादनात सुमारे ३.५ दशलक्ष टन घट होण्याचा अंदाज एफएओचे जागतिक कमोडिटी मार्केट संशोधक फॅबियो पाल्मिरी यांनी व्यक्त केला.

जागतिक पुरवठा मार्चपर्यंत कमी होणार नाह

थायलंडमध्ये अल निनो प्रभावामुळे केवळ ऊस तोडणीचे प्रमाण कमी झाले नाही तर पिकाच्या गुणवत्तेतही बदल झाल्याचे थायलंड शुगर प्लांटर्स असोसिएशनचे नेते नराधिप अनंतसुक यांनी सांगितले. अमेरिकेच्या कृषी विभागाच्या अहवालानुसार थायलंडमधील उत्पादन ऑक्टोबरमध्ये १५ टक्क्यांनी घटू शकते.

ब्राझिलमधील उसाचे उत्पादन गेल्या वर्षीच्या तुलनेत ३० टक्क्यांनी जास्त असण्याचा अंदाज आहे; परंतु जागतिक साखर पुरवठा मार्चपर्यंत कमी होणार नाही, असे कृषी डेटा आणि विश्लेषण फर्म ग्रो इंटेलिजन्सचे वरिष्ठ संशोधन विश्लेषक केली गौगरी यांनी सांगितले.