बाजारभाव

आज पुन्हा सोने आणि चांदीचा वाढीच्या दिशेने प्रवास! आज चांदी पोचली 90 हजार 350 रुपये किलो; मात्र आज सोन्याचे दर काय?

Published by
Ajay Patil

Gold-Silver Price Today:- चांदीचे बाजार भाव जर बघितले तर काही दिवसांपासून उच्चांकी पातळीवर आहेतच. परंतु सातत्याने त्यांच्यामध्ये चढउतार होत असल्याचे आपल्याला दिसून येत आहे. कधी नव्हे इतकी मोठ्या प्रमाणावर सोने आणि चांदीच्या दरात वाढ झाल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्या बाहेर सध्या सोने आणि चांदीची खरेदी गेली आहे.

तसेच येणाऱ्या कालावधीमध्ये परत सोन्याच्या आणि चांदीच्या दरामध्ये मोठी वाढ होईल अशी देखील एक शक्यता वर्तवण्यात येत आहे. जर आपण केडिया ॲडव्हायझरीचे संचालक अजय केडिया यांच्यामते बघितले तर त्यांनी सांगितले आहे की,मोठ्या तेजीनंतर सोन्यामध्ये घसरण होणे गरजेचे होते व ती घसरण आधीच आली आहे.

तसेच अमेरिकेनंतर ब्रिटनने देखील व्याजदरांमध्ये कपात केल्यामुळे गोल्ड ईटीएफची खरेदी वाढेल. सगळ्या परिस्थितीमुळे पुढील वर्षी 30 जून पर्यंत सोने 85 हजार रुपये प्रति दहा ग्रॅम पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आज जर सोन्या-चांदीचे दर पाहिले तर त्यामध्ये आज वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन नुसार बघितले तर आज 24 कॅरेट सोन्याचे एक तोळा म्हणजेच दहा ग्रॅमचे दर 96 रुपयांनी वाढले असून आज 76420 रुपये प्रतितोळा असा दर आहे.

तसेच त्याची देखील अशीच परिस्थिती असून चांदीच्या दरात देखील वाढ होताना दिसून येत आहे. तसेच चांदीच्या दरांमध्ये प्रति किलो 370 रुपयांनी वाढ होऊन चांदी 90 हजार 350 रुपये किलोपर्यंत पोहोचली आहे. जे अगोदर 89 हजार 980 रुपये प्रतिकिलो होती.

देशातील प्रमुख महानगरांमधील आजचे सोन्याचे दर

1- मुंबई- मुंबईमध्ये जर आजचे सोन्याचे दर बघितले तर आज मुंबईत 22 कॅरेट सोन्याची किंमत 71 हजार 300 रुपये प्रति तोळा तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 77 हजार 780 रुपये प्रति तोळा इतकी आहे.

2- कोलकत्ता- कोलकाता येथे आज दहा ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याची किंमत 71 हजार 300 रुपये तर 24 कॅरेट दहा ग्रॅम सोन्याची किंमत 77 हजार 780 रुपये इतकी आहे.

3- दिल्ली- देशाची राजधानी दिल्ली येथे आज 22 कॅरेट सोन्याच्या एक तोळ्याची किंमत 71 हजार 450 रुपये तर 24 कॅरेट च्या दहा ग्रॅम म्हणजेच एक तोळ्याची किंमत 77 हजार 930 इतकी आहे.

4- भोपाळ- भोपाळ येथे 22 कॅरेटच्या एक तोळा सोन्याची किंमत 71350 रुपये तर 24 कॅरेटच्या दहा ग्रॅम म्हणजेच एक तोळा सोन्याची किंमत 77 हजार 830 इतकी आहे.

Ajay Patil