बाजारभाव

Soybean Bajarbhav : खरं काय ! …असं झालं तर सोयाबीन 6 हजारावर जाणार ; वाचा सविस्तर

Published by
Ahmednagarlive24 Office

Soybean Bajarbhav : महाराष्ट्रातील मान्सून माघारी फिरला आहे. यामुळे सध्या राज्यात खरीप हंगामातील पिकांची काढणी जोमात सुरू आहे. दिवाळी सण असतानादेखील शेतकरी बांधव (Farmer) सध्या सोयाबीन पिकाची (Soybean Crop) काढणी करत असल्याचे चित्र आहे.

निश्चितच वर्षातून एकदा येणाऱ्या सणाला देखील शेतकऱ्यांना सुट्टी नाही. शिवाय बाजारात सध्या सोयाबीनला मिळत असलेला बाजारभाव (Soybean Rate) देखील नगण्य आहे. अशा परिस्थितीत शेतकरी बांधवांची सणासुदीला आर्थिक कोंडी होत आहे.

दरम्यान जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन दरात चढ उतार सुरु आहे. यामुळे देशांतर्गत बाजारात सोयाबीन दरात पण चढ उतार पाहायला मिळत आहे.

मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन तेलाची मागणी आणि दर दोन्ही वाढले आहेत. जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, सोयाबीन तेलाच्या दरात जवळपास 10% वाढ झाली आहे.

यामुळे सोयाबीन दरात (Soybean Market Price) वाढ झाली आहे. मात्र अजून अपेक्षित अशी वाढ नमूद करण्यात आलेली नाही. दरम्यान येत्या काही दिवसात रब्बी हंगामाला सुरवात होणार असल्याने शेतकरी बांधव भांडवल उपलब्ध करण्यासाठी सोयाबीनची विक्री करत असल्याचे चित्र आहे.

व्यापाऱ्यांच्या मते सध्या आवक होत असलेल्या सोयाबीनमध्ये ओलावा अधिक आहे यामुळे सोयाबीन बाजार भाव दबावात आले आहेत. सध्या नवं सोयाबीन 4 हजार रुपय प्रति क्विंटल ते 4,700 रुपये प्रति क्विंटल दरम्यान विक्री होत आहे.

जून सोयाबीन मात्र 5 हजार रुपये प्रति क्विंटल ते पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत विकला जात आहे. दरम्यान सोयाबीन तेलाच्या किमती आंतरराष्ट्रीय बाजारात वाढत असून येत्या काही दिवसात सोयाबीन च्या किमती अजून वाढल्या तर सोयाबीन बाजार भावात अजूनच सुधारणा होणार असल्याचे सांगितलं जात आहे.

जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार सोयाबीन पाच हजार रुपये प्रति क्विंटल ते पाच हजार 700 रुपये प्रति क्विंटलपर्यंत विकला जाऊ शकतो. अशा परिस्थितीत येत्या काही दिवसात सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळणार असून सोयाबीन बाजार भाव सहा हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत जाण्याची शक्यता आहे. निश्चितच आगामी काही दिवसात सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

Ahmednagarlive24 Office