बाजारभाव

Cotton Price : कापसाचा भाव कधी वाढणार? शेतकरी भाववाढीच्या प्रतिक्षेत

Published by
Ahmednagarlive24 Office

Cotton Price : पांढरे सोने म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या कापुस पिकाच्या एकुण उत्पादनात घट होऊनही दर सात हजाराच्यावर जात नसल्याने शेवगाव तालुक्यातील ढोरजळगांव परिसरातील शेतकरी अर्थिक संकटात सापडला आहे.

घरात असलेल्या थप्पीचा कापुस भाववाढीच्या प्रतिक्षेत अजुनही घरातच पडुन असुन पाच महिने उलटूनही भाव वाढ होत नसल्याने वजनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.

तालुक्याच्या पश्चिम भागातील ढोरजळगांव परीसराला पांढऱ्या सोन्याचे कोठार म्हणुन ओळखले जाते. या परिसरातील बहुतांश शेतकरी खरीप व दुबार रब्बीत ही कपाशीचे उत्पादन घेतात भुसार मालापेक्षा कपाशी पिकातून एकरकमी आणि अधिकचे उत्पादन मिळत असल्याने इतर पिकांपेक्षा कपाशी क्षेत्रात दिवसेंदिवस वाढ होत आहे.

पांढऱ्या सोन्याचे आगार म्हणून या भागाची ओळख निर्माण होत असतांना गेल्या दोन ते तीन वर्षापासून निसर्गाच्या लहरीपणामुळे कपाशी पिकाची होत गेली. कधी दुष्काळ तर कधी अतिरिक्त पावसामुळे याच्या नुकसानीला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागले.

गेल्या काही वर्षांत नवीन वाण बाजारात विक्रीसाठी येत असुन परंतु निसर्गाचा लहरीपणामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होत असल्याने सध्याच्या घडीला कापसाला जी बाजारपेठ आहे ती परवडणारी नसुन, खाजगी कापुस व्यापाऱ्याकडुन शेतकऱ्यांची सर्रास लुट होत आहे.

नुसता हमीभाव जाहीर करण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या खर्चाचा व उत्पादनाचा विचार करता बाजारपेठेत चांगला दर कसा मिळवुन दिला जाईल. यासाठी शासनस्तरावर लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे.

Ahmednagarlive24 Office