अहमदनगर Live24 टीम, 12 एप्रिल 2022 Breaking News :-  आपल्या देशात सर्वत्र केळीची लागवड (Banana Farming) केली जात असते. महाराष्ट्रात केळीची लागवड विशेष उल्लेखनीय आहे.

राज्यातील खानदेश प्रांतातील (Khandesh) जळगाव जिल्ह्यात सर्वात जास्त केळीचे उत्पादन घेतले जाते. याच जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी (Banana Producer Farmer) एक आनंदाची बातमी समोर येत आहे.

जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपासून तापमानाचा पारा मोठा वाढला आहे. यामुळे फळबाग पिकांना मोठा फटका बसत आहे. जिल्ह्यातील केळीच्या बागा (Banana Orchard) उन्हामुळे अक्षरशा मेटाकुटीला आले असल्याचे बघायला मिळत आहे.

एक ते सात एप्रिल दरम्यान जिल्ह्यात तापमान 42 अंश सेल्सिअस च्या पुढे गेल्याने जिल्ह्यातील केळीच्या बागा फळपिक विमा साठी पात्र ठरले आहेत. हाती आलेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यात एकूण 84 महसूल मंडळ आहेत आणि या सर्व महसूल मंडळातील केळीच्या बागा फळ पीक विम्यासाठी पात्र ठरल्या आहेत.

यामुळे जिल्ह्यातील 42,000 केळी उत्पादक शेतकऱ्यांना (Farmer) पिक विमा मंजूर झाला आहे. या एकूण 42 हजार शेतकऱ्यांना सुमारे 35 हजार रुपये एवढा विमा दिला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. याबाबत खासदार उमेश पाटील यांनी स्वतः माहिती दिली आहे. जिल्ह्यातील 42 हजार शेतकऱ्यांनी फळपिक विमा योजना काढला आहे.

यामुळे निसर्गाच्या लहरीपणामुळे केळीच्या बागांचे नुकसान झाल्यास संबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई (Compensation) दिली जाणार आहे.

मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, गेल्या वर्षी फळ पीक विम्याचा (Fruit Crop Insurance) जाचक नियमांमुळे जळगाव जिल्ह्यातील (Jalgaon) एकूण 84 महसूल मंडळापैकी केवळ तीन महसूल मंडळे फळ पिक विमा साठी पात्र ठरले होते.

मात्र यामध्ये आता मोठा बदल केला गेला असल्याने उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला असून यावर्षी 84 पैकी 84 महसूल मंडळे फळपिक विमा साठी पात्र ठरली आहेत. नुकत्याच डिसेंबर महिन्यात कमी तापमानामुळे केळी पिकाचे नुकसान झाले होते त्यासाठी देखील 77 महसूल मंडळे पात्र झाली आहेत.

यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. 77 महसूल मंडळातील केळी उत्पादक शेतकऱ्यांचे डिसेंबर महिन्यात कमी तापमानामुळे नुकसान झाले होते यामुळे या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना सुमारे 26 हजार पाचशे रुपये मिळणार असून

आता एप्रिल महिन्यात तापमानवाढीमुळे झालेल्या नुकसानीपोटी 35000 रुपये मिळणार आहेत अर्थात या 77 महसूल मंडळातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना पुणे 61 हजार 500 रुपयांची आर्थिक मदत होणार आहे.

बाकी उर्वरित महसूल मंडळातील शेतकऱ्यांना तापमान वाढीमुळे झालेल्या नुकसानीपोटी नुकसानभरपाई दिली जाणार आहे अर्थात या उर्वरित महसूल मंडळातील शेतकऱ्यांना 35 हजार रुपये दिले जाणार आहेत. सध्या केळीला अपेक्षित असा बाजार भाव मिळत नसल्याने फळ पिक विम्याची रक्कम निश्चितच केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते.