Ahmednagar News:श्रीरामपूरमध्ये बँकेसमोर सुरक्षारक्षकाच्या बंदुकीतून चुकून सुटलेले गोळी ग्राहकाला लागून त्याचा जागीच मृत्यू झला. अजित विजय जोशी (वय ५०) रा. वॉर्ड नंबर ७, श्रीरामपूर) असे ठार झालेल्या ग्राहकाचे नाव आहे.

तर सुरक्षारक्षक रक्षक दशरथ कारभारी पुजारी (वय ५७, रा. बेलापूर) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.श्रीरामपूर शहरातील जिल्हा मध्यवर्ती सरकारी बँकेच्या शाखेसमोर ही घटना घडली.

दुपारी तालुक्यातील अशोक सहकारी बँकेचे पथक पैसे नेण्यासाठी जिल्हा बँकेच्या शाखेत आले होते. त्यांच्यासोबत बंदूकधारी सुरक्षारक्षक दशरथ कारभारी पुजारी हे होते. अधिकाऱ्यांनी पैसे घेतले आणि ते जायला निघाले.

त्यावेळी बाहेर थांबलेला सुरक्षारक्ष पुजारी हा सज्ज झाला. त्यावेळी अजित जोशी हेही बँकेच्या कामासाठी आले होते. बँकेसामोर ते दुचाकीवरून उतरत होते. त्याच वेळी बंदूकीसह सज्ज होत असलेला सुरक्षारक्ष पुजारी याच्याकडून ट्रीगर दाबला जाऊन गोळी सुटली.

ती गोळी थेट जोशी यांच्या डोक्यात घुसली. त्यामुळे जोशी काही क्षणात रक्ताच्या थारोळ्यात पडले.घटनेची माहिती मिळतात पोलिस पथक आणि अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

जोशी यांना रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, त्यांचा मृत्यू झाला होता. अपर पोलिस अधीक्षक स्वाती भोर यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सुरक्षारक्षक पुजारी याला ताब्यात घेण्यात आले आहे.