Banking Rules :  बँकिंग नियमांचे (banking rules) योग्य पालन न केल्यामुळे, RBI अनेकदा बँकांवर (banks) कारवाई करत असते.

सध्या भारतीय रिझर्व्ह बँक सहकारी बँकांबाबत (Co-Operative Banks) अधिक खबरदारी घेत आहे.  आता रिझर्व्ह बँकेने एकाच वेळी आठ सहकारी बँकांवर कारवाई केली आहे. बँकिंगच्या काही तरतुदींचे पालन न केल्यामुळे रिझर्व्ह बँकेने 55 लाख रुपयांपर्यंतचा दंड ठोठावला आहे.

या सहकारी बँकेवर सर्वाधिक दंड
रिझर्व्ह बँकेने निवेदनात म्हटले आहे की, 8 सहकारी बँकांवर कारवाई करण्यात आली आहे. आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम सहकारी बँकेला (The Vishakhapattnam Co-operative Bank) सर्वाधिक 55 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

बँकेने उत्पन्नाची ओळख, मालमत्तांचे वर्गीकरण आणि गृहनिर्माण योजनांना वित्तपुरवठा यासंबंधीच्या तरतुदींचे उल्लंघन केले होते. यामुळे रिझर्व्ह बँकेने त्याला 55 लाखांचा दंड ठोठावण्याचा निर्णय घेतला.

या बँकेवर कारवाई 

रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे की, भारत हेवी इलेक्ट्रिकल्स एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह बँक, तिरुचिरापल्ली, तमिळनाडूने (Bharat Heavy Electricals Employees’ Co-operative Bank) माहिती देण्याशी संबंधित तरतुदींचे उल्लंघन केल्याचे आढळून आले आहे.

त्याचप्रमाणे केरळमधील पलक्कड जिल्ह्यात असलेल्या ओट्टापलम को-ऑपरेटिव्ह अर्बन बँक लिमिटेडवर (The Ottapalam Co-operative Urban Bank Ltd) 05 लाख रुपये आणि हैदराबाद, तेलंगणा येथील द दारुसलाम को-ऑपरेटिव्ह अर्बन बँक (The Darussalam Co-operative Urban Bank) यांना 10 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

या बँकांनाही भरावा लागणार दंड 

रिझर्व्ह बँकेने आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यात स्थित नेल्लोर को-ऑपरेटिव्ह अर्बन बँक लिमिटेड (The Nellore Co-operative Urban Bank Ltd) आणि आंध्र प्रदेशच्या पूर्व गोदावरी जिल्ह्यात स्थित काकीनाडा को-ऑपरेटिव्ह टाऊन बँक लिमिटेड (Kakinada Co-operative Town Bank Ltd) यांना प्रत्येकी 10 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

या व्यतिरिक्त केंद्रपारा येथील केंद्रपारा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक (The Kendrapara Urban Co-operative Bank) आणि प्रतापगड, उत्तर प्रदेश येथील नॅशनल अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड (National Urban Co-operative Bank Ltd) यांच्यावर 01 लाख रुपये आणि 05 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

महिन्याच्या सुरुवातीला या बँकांनाही ठोठावला दंड 
या महिन्याच्या सुरुवातीलाही रिझर्व्ह बँकेने आठ सहकारी बँकांवर कारवाई केली होती.  रिझर्व्ह बँकेने मेहसाणा सहकारी बँक (Mehsana Urban Co-operative Bank, Gujarat), वरुड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक (Warud Urban Co-operative Bank, Warud, Maharashtra), जिल्हा सहकारी सेंट्रल बँक मरियडित (ila Sahakari Kendriya Bank Maryadit, Chhindwara, Madhya Pradesh)

यवतमाळ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक (Yavatmal Urban Co-operative Bank, Yavatmal, Maharashtra), छत्तीसगढ राज्य सहकारी बँक मरियडित, रायपूर (Chhattisgarh Rajya Sahakari Bank Maryadit, Raipur), गढ स्थित मध्य प्रदेशातील गुना- ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड (Garha Co-operative Bank Limited, Guna, Madhya Pradesh) आणि पणजीस्थित गोवा राज्य सहकारी बँक (Goa State Co-operative Bank, Panaji) यांना दंड ठोठावण्यात आला.